
भाजपने तेजस्वी यादव यांच्या दहा लाख रोजगाराच्या घोषणेला शह देण्यासाठी 19 लाख रोजगार देण्याचा दावा केला आहे.
Bihar Election : बिहारला मोफत कोरोना लस, 19 लाख रोजगार; भाजपाचा जाहीरनामा प्रसिद्ध
पाटणा : भाजपाने गुरुवारी बिहार विधानसभेचा जाहीरनामा संकल्प पत्र या नावाने जाहीर केला. या संकल्पपत्रात शिक्षण, स्वास्थ्य, आयटीसहीत विविध क्षेत्रात 19 लाख रोजगार देण्याचे आश्वासन दिले आहे. या जाहीरनाम्यात एका वर्षात तीन लाख शिक्षकांची भरती करण्याचेही आश्वासन दिले आहे. तसेच प्रत्येक बिहारवासीला कोरोनाची लस मोफत देण्याचे वचन देखील भाजपने दिले आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते आज साडे दहाच्या सुमारास या जाहीरनाम्याचे प्रकाशन झाले.
हेही वाचा - 'आत्मनिर्भर भारत'; अँटी-टँक गाइडेड मिसाइल 'नाग'ची चाचणी यशस्वी
यामध्ये म्हटलंय की, प्रत्येक बिहारवासीचे मोफक कोरोना लशीकरण केले जाईल. बिहारमध्ये मेडीकल आणि टेक्निकल शिक्षण हिंदी भाषेत उपलब्ध करुन दिले जाईल. एका वर्षांत तीन लाख नव्या शिक्षकांची भरती केली जाईल. बिहारमध्ये येत्या पाच वर्षांत आयटी हबची निर्मिती करुन पाच लाख रोजगार दिले जातील, असंही म्हटलं आहे. 50 हजार कोटी रुपयांची मदत स्वयं सहाय्यता समूहाला देऊन महिलांना स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न केला जाईल.
पाच वर्षांचा रोडमॅप
या संकल्प पत्रामध्ये पाच सूत्र, एक लक्ष्य आणि 11 संकल्प केले गेले आहेत. पक्षाने या संकल्पपत्राद्वारे पुढीच पाच वर्षांचा रोडमॅप देखील जाहीर केला आहे. भाजपने तेजस्वी यादव यांच्या दहा लाख रोजगाराच्या घोषणेला शह देण्यासाठी 19 लाख रोजगार देण्याचा दावा केला आहे.
पंतप्रधान मत्स्य संपकदा योजने अंतर्गत पुढच्या दोन वर्षांत गोड्या पाण्यातील माशांच्या उत्पादनात बिहारला नंबर एक बनवले जाईल. बिहारच्या एक हजार नव्या शेतकरी उत्पादन संघटनांना एकमेकांशी जोडलं जाईल.
हेही वाचा - PM मोदी पहिल्यांदाच दुर्गा पुजेत सहभागी, तृणमूलची भाजपवर टीका
भाजपाच्या जाहीरनाम्याचा थोडक्यात आढावा
- 1 कोटी महिलांना स्वावलंबी बनवण्यास मदत
- कोरानाची लस मोफत देणार
- मेडीकल/टेक्निकल शिक्षण हिंदी भाषेत देणार
- 2024 पर्यंत अखिल भारतीय आरोग्य संस्थेची (एम्स) उभारणी
- धान्य आणि गव्हाबरोबरच सरकार डाळीही विकत घेणार
- 2022 पर्यंत ग्रामीण आणि शहरी भागात 30 लाख लोकांना पक्के घर
- गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादनात एक वर्षात बिहारला पहिल्या क्रमांकावर आणणार
- दुग्ध उत्पादनाशी निगडीत 15 नव्या उद्योगांची उभारणी
- 3 लाख शिक्षक भरती
- बिहारला आयटी हब बनवून 5 लाख रोजगार
Web Title: Bihar Election Bjp Manifesto Free Corona Vaccination 19 Lakh Employment
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..