esakal | PM मोदी पहिल्यांदाच दुर्गा पुजेत सहभागी, तृणमूलची भाजपवर टीका
sakal

बोलून बातमी शोधा

modi bangal

राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे की, पश्चिम बंगालमध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वांत मोठ्या समारंभामध्ये पंतप्रधान मोदी उपस्थित राहून या संधीचा फायदा घेऊ पाहत आहे.

PM मोदी पहिल्यांदाच दुर्गा पुजेत सहभागी, तृणमूलची भाजपवर टीका

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

कोलकाता : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज कोलकातामध्ये व्हिडीओ कॉन्फ्रंसिंगद्वारे दुर्गा पुजेच्या मंडळाचे उद्घाटन केले आहे. कोरोना महामारीच्या दरम्यान पश्चिम बंगालमध्ये आजपासून पाच दिवसीय दुर्गा पुजेचा समारंभ सुरु होणार आहे. या दरम्यान भाजपाने असा दावा केलाय की राज्यात जवळपास 78 हजार बुथवर पंतप्रधान मोदींचे लाईव्ह भाषण प्रदर्शित करण्यासाठी टीव्ही स्क्रीन्स लावले गेले आहेत. 

कोलकाताच्या सॉल्ट लेकमध्ये पंतप्रधान मोदींनी भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयाच्या एका सांस्कृतिक केंद्राद्वारे स्थापन केलेल्या दुर्गा पुजेच्या मंडळाचे उद्घाटन केले आहे. याबाबत मोदींनी काल संध्याकाळीच ट्विट करुन माहिती दिली होती की ते सकाळी दहा वाजता या समारंभात सामिल होतील. दुपारी ते लोकांना व्हर्च्यूअली संबोधित करणार आहेत. 

पंतप्रधान मोदींच्या भाषणाआधी या कार्यक्रमात मंडळाच्या मंचावर अनेक मोठे कलाकार आपल्या सांस्कृतिक कलेचे सादरीकरण केलं आहे. दोन तासाच्या या कार्यक्रमात बीसीसीआयचे अध्यक्ष सौरभ गांगुली यांची पत्नी डोना गांगुली या आपले नृत्य सादर केलं आहे.  आज महाषष्टी आहे. आजपासूनच पाच दिवसीय दुर्गा पुजेचा समारंभ सुरु होतो. दुर्गा पूजा ही बंगाली समाजात महत्त्वपूर्ण मानली जाते. हा मोठा सण म्हणून बंगालमध्ये साजरा केला जातो. मुख्यंमत्री ममता बॅनर्जी यांनी कोलकाता शहरामध्ये 200 हून अधिक पूजेच्या मंडळांचे उद्धाटन केले आहे. 

हेही वाचा - 'आत्मनिर्भर भारत'; अँटी-टँक गाइडेड मिसाइल 'नाग'ची चाचणी यशस्वी

राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे की भाजपा या संधींचा सर्वांत जास्त फायदा घेऊ इच्छित आहे. पश्चिम बंगालमध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वांत मोठ्या सणसमारंभामध्ये पंतप्रधान मोदी उपस्थित राहून या संधीचा फायदा घेऊ पाहत आहे. राज्यात सत्ताधारी तृणमूल काँग्रेस पार्टीला आजचा मोदींचा हा समारोह अर्थातच आवडलेला नाहीये. टीएमसीच्या एका नेत्याने म्हटलंय की, ते अनेक वर्षांपासून पंतप्रधान आहेत. मात्र, ते आताच या वर्षीच दुर्गा पुजेमध्ये पहिल्यांदाच बंगालमध्ये का बरे भाषण करत आहेत? यासाठी का की येत्या काही दिवसांत बंगालमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत म्हणून?

हेही वाचा - Corona Update : गेल्या 24 तासांत 717 जणांचा मृत्यू; सध्या 7,15,812 ऍक्टीव्ह रुग्ण

मागच्या वर्षी जेंव्हा अमित शहा सॉल्ट लेकच्या मधील दुर्गा पुजेचं उद्धाटन करायला आले  होते तेंव्हा भाजपाने असा दावा केला होता की, पुजा समितीच्या सदस्यांना तृणमूल काँग्रेसच्या गुंडांना धमकावलं होतं. पूजा समितीला अडचणी नको होत्या म्हणून त्यांनी आता स्वत:चंच मंडळ स्थापन करुन मोदींना आमंत्रित केलं आहे. पश्चिम बंगालमध्ये येत्या वर्षी विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत.