esakal | Video: बिहारमध्ये निवडणुकीची घोषणा होताच जोरदार राडा
sakal

बोलून बातमी शोधा

bihar election bjp workers beat up workers of pappu yadav jan adhikar party video viral

बिहार विधानसभा निवडणुकींच्या तारखांची घोषणा झाल्यानंतर काही तासांमध्येच भारतीय जनता पक्ष आणि पप्पू यादव यांच्या जन अधिकार पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणारामी झाली. संबंधित व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Video: बिहारमध्ये निवडणुकीची घोषणा होताच जोरदार राडा

sakal_logo
By
वृत्तसंस्था

पाटना: बिहार विधानसभा निवडणुकींच्या तारखांची घोषणा झाल्यानंतर काही तासांमध्येच भारतीय जनता पक्ष आणि पप्पू यादव यांच्या जन अधिकार पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणारामी झाली. संबंधित व्हिडिओ व्हायरल होत आहे.

काश्मीरमध्ये चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा

यादव यांचे पोस्टर्स असलेली प्रचाराची गाडी जात असताना भाजप कार्यकर्ते आणि यादव कार्यकर्ते यांच्यात बाचाबाची झाली. बाचाबाचीचे रुपांतर भांडणात आणि नंतर हाणामारी झाले. भर रस्त्यातच हाणामारीचा प्रकार घडला. भाजपच्या कार्यकर्त्यांनी यादव यांच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली. अखेर नागरिक आणि पोलिसांनी हस्तक्षेप करत दोन्हीपक्षांच्या कार्यकर्त्यांना शांत केले. निवडणुकांमुळे राज्यातले वातावरण तापू लागल्यामुळे कार्यकर्ते सक्रिय झाले आहेत.

दरम्यान, बिहार विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. बिहार विधानसभेच्या 243 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीच्या तारखा आज (शुक्रवार) जाहीर झाल्या आहेत. बिहारमध्ये 28 ऑक्टोबरपासून 3 टप्प्यात निवडणूक होणार आहे. निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 28 ऑक्टोबरला दुसऱ्या टप्प्यात  3 नोव्हेंबरला तर तिसऱ्या टप्प्यात 7 नोव्हेंबरला मतदान होणार असून, 10 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे, अशी माहिती दिल्लीतील विज्ञान भवनमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी दिली. बिहार निवडणुकीवर कोरोनाचा मोठा परिणाम झाला आहे. कोरोनामुळे जगातील 70 देशांमध्ये निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. मध्य प्रदेश, कर्नाटक आणि उत्तर प्रदेशात पोटनिवडणुकीच्या तारखांची घोषणा 29 नोव्हेंबरला करण्यात येईल, असेही अरोरा यांनी सांगितले.