काश्मीरमध्ये चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा

वृत्तसंस्था
Friday, 25 September 2020

जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यामध्ये सुरक्षा दलाच्या जवानांनी केलेल्या कारवाईत आज (शुक्रवार) लष्कर-ए-तोयबाचे दोन दहशतवादी ठार झाले. लष्कराने परिसर ताब्यात घेतला असून, शोधमोहिम सुरू केली आहे.

श्रीनगर: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यामध्ये सुरक्षा दलाच्या जवानांनी केलेल्या कारवाईत आज (शुक्रवार) लष्कर-ए-तोयबाचे दोन दहशतवादी ठार झाले. लष्कराने परिसर ताब्यात घेतला असून, शोधमोहिम सुरू केली आहे.

Video: चिनी सैनिक सीमेवर जाताना ढसाढसा रडले

पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील सिरहामा येथे दहशतवादी लपून बसले असून, ते मोठा घातपात घडवण्याच्या तयारीत असल्याची माहिती लष्कराला मिळाली होती. या माहितीनंतर परिसरात सीमा सुरक्षादलाच्या जवानांनी शोधमोहिम हाती घेतली. दहशतवादी पळून जावू नये म्हणून रात्रभर जवानांनी या परिसराला घेराव घातला होता. दहशतवाद्यांनी जवानांच्या दिशेने गोळीबार सुरू केला. जवानांनी प्रत्युत्तर म्हणून केलेल्या कारवाईत लष्कर-ए-तोयबाच्या दोन्ही दहशतवाद्यांना ठार करण्यात यश आले. घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.

माझ्या मृत्यूला देवच जबाबदार...

दरम्यान, शोपियांमध्ये आज सकाळी सचिवालयाच्या गेटवर सीआरपीएफ जवान तैनात करण्यात आले होते. तेव्हा काही दहशतवाद्यांनी गेटवर येऊन थेट जवानांवर गोळीबार केला आणि पळ काढला. या गोळीबारात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर परिसरात दहशतवाद्यांना पकडण्यासाठी शोध मोहिम हाती घेण्यात आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: two terrorists killed in encounter at anantnag jammu and kashmir