

Election strategist Prashant Kishor receives a notice from the Election Commission ahead of the Bihar elections, sparking political debate.
esakal
Election Commission’s Notice to Prashant Kishor : बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दररोज नवनवीन राजकीय घडामोडी घडत आहे. दरम्यान आता जन सुराज पार्टीचे प्रमुख प्रशांत किशोर या निवडणुकीआधीच एक मोठा झटका बसला आहे. कारण, निवडणूक आयोगाने त्यांना नोटीस पाठवली आहे.
प्रशांत किशोर यांचे नाव बिहार आणि पश्चिम बंगाल या दोन्ही राज्यांच्या मतदार यादीत आहे, असे एका निवडणूक अधिकाऱ्याने सांगितले आहे. यामुळे प्रशांत किशोर यांना नोटीस पाठवून, याबाबत तीन दिवसांच्या आता उत्तर मागण्यात आले आहे.
किशोर यांची जन सुराज पार्टी यंदा बिहार विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवत आहे. दरम्यान, सासाराम येथील निवडणूक अधिकाऱ्यांनी किशोर यांना नोटीस बजावली आहे, ज्यामध्ये त्यांना त्यांची बाजू मांडण्यासाठी तीन दिवसांची मुदत दिली गेली आहे.
निवडणूक नोंदणी अधिकाऱ्यांनी किशोर यांचे बिहारमध्ये आणि पश्चिम बंगालमध्ये अशा दोन वेगवेगळ्या यादीत आढळल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आता त्यांना या दुहेरी नाव नोंदणीचे स्पष्टीकरण देण्यास सांगण्यात आले आहे.
दरम्यान, कोलकाता येथील निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले की अधिकृत नोंदीनुसार, पश्चिम बंगालमध्ये मतदार म्हणून नोंदणीकृत किशोर यांचा पत्ता १२१, कालीघाट रोड आहे, जो कोलकाताच्या भवानीपूर विधानसभा मतदारसंघातील तृणमूल काँग्रेसच्या मुख्यालयाचा पत्ता आहे. तर भवानीपूर विधानसभा मतदारसंघ हा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सुप्रीमो ममता बॅनर्जी यांचा मतदारसंघ आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.