esakal | Bihar Election: रविशकुमार यांच्या भावाला काँग्रेसची उमेदवारी
sakal

बोलून बातमी शोधा

Brajesh Kumar Pandey

काँग्रेसने ब्रजेश पांडे यांना मोतिहारीतील गोविंदगंज मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. ब्रजेश काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्षही होते. एका तरुणीने लैंगिक अत्याचाराचे आरोप केल्याने ब्रजेश अडचणीत आले होते.

Bihar Election: रविशकुमार यांच्या भावाला काँग्रेसची उमेदवारी

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आज उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. यात ज्येष्ठ पत्रकार रवीशकुमार यांचे बंधू ब्रजेश कुमार पांडे यांचे आहे. ब्रजेश यांना तिकिट मिळाल्यावरुन रवीश यांना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले आहे. 

काँग्रेसने ब्रजेश पांडे यांना मोतिहारीतील गोविंदगंज मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. ब्रजेश काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्षही होते. एका तरुणीने लैंगिक अत्याचाराचे आरोप केल्याने ब्रजेश अडचणीत आले होते. आरोप झाल्यानंतर त्यांनी काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. 2015 मध्येही ब्रजेश काँग्रेसकडूनच गोविंदगंजमधून रिंगणात उतरले होते.  

Bihar Election: डॉ. मसकूर उस्मानींना तिकीट मिळाल्याने खळबळ; काँग्रेसला घरचा आहेर

लोक जनशक्ती पक्षाचे राजू तिवारी यांनी त्यांचा पराभव केला होता. गेल्या निवडणुकीतील प्रतिज्ञापत्रानुसार ब्रजेश यांच्याकडे दीड कोटी रुपयांची स्थावर व जंगम मालमत्ता असून, साडेतीन लाखांचे कर्ज आहे. ब्रजेश यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सोशल मीडियावर रवीशकुमार यांना ट्रोल करण्यात येत आहे. ब्रजेश यांचा राहुल गांधी यांच्यासोबतचा फोटोही व्हायरल झाला आहे. 

 Bihar Election : मोदी घेणार 12 प्रचारसभा; कोरोनावर मात करुन अमित शहाही मैदानात​

बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीत सत्तारुढ संयुक्त जनता दल (जेडीयू) आणि भाजपच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीविरोधात (एनडीए) राष्ट्रीय जनता दल (आरजेडी), काँग्रेस आणि डावे यांची महाआघाडी असे चित्र आहे. बिहार विधानसभेची निवडणूक तीन टप्प्यांत होणार आहे. पहिला टप्पा 28 ऑक्टोबरला मतदान होणार असून, यात 71 मतदारसंघ आहेत. दुसरा टप्पा  3 नोव्हेंबरला असून, यात 94 मतदारसंघांसाठी मतदान होणार आहेत. तिसरा टप्पा 7 नोव्हेंबर असून, यात 78 मतदारसंघांत मतदानाची प्रक्रिया होणार आहेत. 10 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहेत.