नेता असावा तर असा! चार वेळा आमदार पण पक्कं घर नाही, आजही करतात शेती

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 15 November 2020

चौथ्यांदा आमदार झालेल्या राजकारण्याकडे पक्कं घर नाही आणि आजही शेतात काम करतो असं सांगितलं तर विश्वास बसणार नाही.

पाटणा - एखाद्या पक्षाचा पदाधिकारी असला तरी त्याचा वेगळाच रुबाब बघायला मिळतो. राजकारणी म्हणजे पैसा, गाड्या, बंगला, संस्था असं सर्रास चित्र दिसतं. याला अपवादही असतात जे समाजकारणातून राजकारणात आलेले असतात. चौथ्यांदा आमदार झालेल्या राजकारण्याकडे पक्कं घर नाही आणि आजही शेतात काम करतो असं सांगितलं तर विश्वास बसणार नाही. पण हे खरं आहे बिहारच्या निवडणुकीत महबूब आलम चौथ्यांदा आमदार झाले आहेत. त्यांना राहण्यासाठी अजुनही स्वत:चं पक्कं घर नाही.

बिहार विधानसभा निवडणुकीत कटिहार जिल्ह्यातील बलरामपूर मतदारसंघातून महबूब आलम यांनी विजय मिळवला आहे. सीपीआय एमएलकडून निवडणूक लढताना आलम यांनी व्हीआयपीचे उमेदवार वीरेंद्र कुमार ओझा यांचा 53 हजार 597 मतांनी पराभव केला.  महबूब आलम हे चर्चेत असणारे नेते आहेत. 2015 मध्ये जेव्हा जदयू-राजद आणि काँग्रेस एकत्र लढले होते तेव्हाही सीपीआय एमल चे तीन उमेदवार निवडून आले होते. त्यापैकी एक आलम हे होते. 

हे वाचा - दहा वर्षांपासून भीक मागणारा निघाला DSP च्या बॅचचा पोलिस अधिकारी

2016 मध्ये महबूब आलम यांच्यावर एका बँकेच्या शाखा व्यवस्थापकाला थप्पड मारल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यांनी आरोप फेटाळून लावला होता पण सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोप सिद्ध झाला होता. 

हे वाचा - स्वातंत्र्य लढा ते पंतप्रधान पदाची कारकिर्द; पंडित नेहरूंबद्दल या गोष्टी माहिती आहेत का?

चार वेळा आमदार असूनही पक्कं घर नसलेला हा नेता आजही चालत फिरतात. आलम हे स्वत: शेतामध्ये काम करताना दिसतात. बिहारच्या विधानसभेत जवळपास 80 टक्क्यांहून अधिक आमदार असे आहेत ज्यांची संपत्ती कोट्यवधींच्या घरात आहे. मात्र महबूब हे असे आमदार आहेत ज्यांच्याकडे पक्कं घर नाही. सध्या 44 वर्षांचे असलेले महबूब आलम 10 वी पास आहेत. तसंच शेती हाच त्यांचा प्रमुख व्यवसाय आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bihar election cpi lm leader 4th time mla mehboob alam