स्वातंत्र्य लढा ते पंतप्रधान पदाची कारकिर्द; पंडित नेहरूंबद्दल या गोष्टी माहिती आहेत का?

सकाळ न्यूज नेटवर्क
Saturday, 14 November 2020

भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात ब्रिटिशांविरोधातील लढ्यात पंडित जवाहरलाल नेहरु अग्रणी होते

नवी दिल्ली- भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात ब्रिटिशांविरोधातील लढ्यात पंडित जवाहरलाल नेहरु अग्रणी होते. याशिवाय देशात धर्मनिरपेक्षता रुजवण्यातही त्यांचे महत्वाचे योगदान होते. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान बनण्याचा मान नेहरुंना मिळाला. जवाहरलाल नेहरुंबद्दल क्वचितच माहित असलेले काही तथ्य आपण जाणून घेऊयात...

1. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेण्याआधी नेहरु आपल्या वडिलांप्रमाणे वकिलीची प्रॅक्टिस करायचे. 1910 मध्ये ट्रिनिटी कॉलेज, कॅम्ब्रिजमधून पदवी घेतल्यानंतर त्यांनी आपले नाव अलाहाबाद हाय कोर्टामध्ये नोंदवले होते. 

2. नेहरु हे समाजवादी विचारसरणीचे होते. ते 1917 मधील बोल्शेविक क्रांतीने प्रभावित झाले होते. 1927 मध्ये त्यांनी तेव्हाच्या सोवियन युनियनला (आताच्या रशिया) भेट दिली होती. भारताचे पहिले पंतप्रधान झाल्यानंतर पंडित नेहरु यांनी सोवियत युनियनकडून मिश्र अर्थव्यवस्थेला चालना दिली. 

3. स्वातंत्र्य लढ्यादरम्यान नेहरुंनी 3258 दिवस तुरुंगात काढली आहेत. 

4. 1920 पासून जवाहरलाल नेहरु काँग्रेसमधील डाव्या विचारसरणीकडे झुकणारे नेते होते. संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी पुढे करणारे ते काँग्रेसमधील पहिले नेते होते. 

5. जवाहरलाल नेहरु दोन वेळा (1919 आणि 1928) काँग्रेसचे अध्यक्ष बनले. 

Children's Day 2020: बाल दिनानिमित्त जाणून घ्या चाचा नेहरुंचे प्रेरक विचार

6. 1960 च्या दशकात अलिप्ततावादी गटाच्या Non-Aligned Movement (NAM) स्थापनेमध्ये आणि कार्यामध्ये नेहरु यांची महत्वाची भूमिका होती.  नाम ही नव्याने स्वातंत्र्य मिळालेल्या देशांची चळवळ होती. अमेरिका किंवा सोवियत युनियनमध्ये सुरु असलेल्या शीत युद्धादरम्यान या देशांनी कोणत्याही बाजूने न झुकण्याचा (कम्युनिस्ट किंवा भांडवलशाही) निर्णय घेतला होता. या देशांनी साम्राज्यवाद, वसाहतवाद, नव-वसाहतवाद आणि वंशवादाला विरोध केला होता.

7. नेहरुंचा वाढदिवस बाल दिन म्हणून साजरा केला जातो. ते चाचा नेहरु या नावाने लोकप्रिय आहेत. 

8. नेहरु यांच्यावर अनेकदा प्राणघातक हल्ले (1947, 1955, 1956, 1961) झाले होते. 

9. हर्ट अटॅकमुळे 27 मे 1967 मध्ये नेहरुंचा मृत्यू झाला. 1962 मध्ये भारत-चीन युद्धाच्या धक्क्यामुळे त्यांचे आरोग्य बिघडत गेल्याचे सांगितले जाते. 1954 मध्ये नेहरु आणि चीनचे प्रमुख झोऊ उनलाई यांच्यामध्ये पंचशील करार (five principles for peaceful co-existence) झाला होता. तिबेटचे दलाई लामा यांना आश्रय दिल्याने चीनचा भारतावरील विश्वास उडाल्याचे सांगितले जाते. 

10. नेहरुंच्या पार्थिवाला श्रद्धांजली वाहण्यासाठी दिल्लीच्या रस्त्यावर जवळपास 15 लाख लोक जमा झाले होते. 

(edited by- kartik pujari)

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Children Day 2020 jawaharlal Nehru 10 lesser known facts