esakal | Bihar Election : 'फोडाफोडीला भीक घालणार नाही; आम्ही NDA सोबतच!'
sakal

बोलून बातमी शोधा

jitanram manjhi

बिहार निवडणुकीत एनडीएला 125 जागा प्राप्त झाल्या आहेत. यामध्ये भाजप  हा मोठा भाऊ ठरला असून त्यांना 74 जागा प्राप्त झाल्या आहेत.

Bihar Election : 'फोडाफोडीला भीक घालणार नाही; आम्ही NDA सोबतच!'

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पाटणा : बिहार विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल गेल्या 10 तारखेला लागला आहे. या निवडणुकीत एनडीएला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. एनडीचाच एक घटक पक्ष असलेल्या हिंदुस्तानी आवाम मोर्चाने आपली भुमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी म्हटलंय की, आम्ही नितीश कुमार आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीसोबतच राहू. 

हेही वाचा - Bihar Election : ही माझी शेवटची निवडणूक म्हणणाऱ्या नितीश कुमार यांचा यु-टर्न

सध्या निकालानंतर फोडाफोडीचं राजकारण सुरु झालं आहे. दुसऱ्या पक्षांकडून सातत्याने यासाठी संपर्काचा प्रयत्न केला जातो आहे. एनडीएला रामराम ठोकून त्यांच्याकडे येण्यासाठी सांगितलं जात आहे. मात्र, आम्ही एनडीएसोबतच आहोत. त्यांनी पुढे म्हटलंय की, आम्ही हे स्पष्ट करु इच्छित आहे की आम्ही एनडीएसोबतच राहू. आमचे नेते जितनराम मांझी यांनी स्पष्टपणे सांगितलंय की हिंदुस्तानी आवाम मोर्चाने ही निवडणूक मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली लढवली आहे. आम्ही त्यांच्यासोबत होतो आणि आम्ही त्यांच्यासोबतच राहू. हिंदूस्तानी आवाम मोर्चाचे प्रवक्ता दानिश रिझवान यांनी म्हटलंय. जितनराम मांझी यांनी गेल्या ऑगस्टमध्ये एनडीएतून बाहेर पडून राष्ट्रीय जनता दलाच्या नेतृत्वातील महागठबंधनला साथ दिली होती. मात्र, त्यानंतर लगेचच दोन दिवसांत त्यांनी पुन्हा आपल्या एनडीएच्या स्वगृही प्रवेश केला. विधानसभा निवडणुकीच्या आधीच नितीश कुमार यांनी त्यांना एनडीएत घेतलं. 

हेही वाचा - दिल्ली आणि गोव्याच्या मुख्यमंत्र्यांमध्ये ट्विटर वॉर

243 जागांसाठी बिहार विधानसभेची निवडणूक झाली होती. यामध्ये एनडीएला 125 जागा प्राप्त झाल्या आहेत. यामध्ये भाजप  हा मोठा भाऊ ठरला असून त्यांना 74 जागा प्राप्त झाल्या आहेत. जेडीयूला 43 जागा मिळाल्या आहेत. विकासशील इन्सान पार्टीला आणि हिंदूस्तानी आवाम मोर्चाला प्रत्येकी चार जागा प्राप्त झाल्या आहेत. तर विरोधी महागठबंधनला 110 जागा प्राप्त झाल्या आहेत. यामध्ये राजदला 75 तर काँग्रेसला 19 जागा मिळाल्या आहेत. डाव्या पक्षांना 16 जागा मिळाल्या आहेत.