esakal | दिल्ली आणि गोव्याच्या मुख्यमंत्र्यांमध्ये ट्विटर वॉर
sakal

बोलून बातमी शोधा

tweet war

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या या टोल्याला केजरीवाल यांनीही प्रत्युत्तर दिलं.

दिल्ली आणि गोव्याच्या मुख्यमंत्र्यांमध्ये ट्विटर वॉर

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : दिल्लीच्या प्रदुषणाची समस्या ज्वलंत आहे. दिल्लीची हवा ही मानवी श्वासोच्छवासासाठी योग्य राहिलेली नाहीये, इतपत तिथल्या हवेचे अवमूल्यन झाले आहे. यावरुन सातत्याने दिल्ली राज्य सरकार आणि केंद्र सरकारमध्ये तू-तू-में-में पहायला मिळतं. पंजाबमध्ये जाळल्या जाणाऱ्या शेतातील गवत आणि तणामुळे दिल्ली भागात हा प्रदुषणाचा प्रश्न निर्माण होतो, असं म्हटलं जातं. या साऱ्या प्रदुषणाच्या प्रश्नावर आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यात ट्विटरवरुनच बाचाबाची झाल्याचं दिसून येतंय. 

हेही वाचा - अरुंधती रॉय यांचे पुस्तक अभ्यासक्रमातून घेतलं मागे; वादग्रस्त असल्याचा शेरा
गोव्यामध्ये पर्यावरणासंदर्भात सुरु असणाऱ्या एका विरोध प्रदर्शनाला अरविंद केजरीवाल यांनी समर्थन देणारे ट्विट केले होते. या समर्थानात त्यांनी राज्यातील भाजपच्या सरकारवर टीकाही केली होती. त्यांच्या या टीकेला गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी उत्तर दिल. 

केजरीवाल यांनी ट्विट करताना भाजप सरकारवरही निशाणा साधला होता. त्यांनी पर्यावरण संरक्षणासाठी लढणाऱ्या नागरिकांचे कौतुक करत समर्थन केले होते. तसेच राज्यातील विरोध मिटवून टाकण्याचा प्रयत्न सरकार करत असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. याला गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं. त्यांनी केजरीवालांना गोव्याची चिंता न करता दिल्लीच्या प्रदुषणाच्या समस्येवर लक्ष्य देण्याचा टोला लगावला. 

हेही वाचा - Fact Check - भारतात 1 डिसेंबरपासून पुन्हा लॉकडाऊन होणार असा व्हायरल मेसेजमध्ये दावा

सावंत यांच्या या टोल्याला केजरीवाल यांनीही प्रत्युत्तर दिलं. त्यांनी म्हटलं की, ही समस्या फक्त दिल्ली किंवा गोव्याची नाहीये. गोवा आणि दिल्ली दोन्हीही मला प्रियच आहेत. आपण सगळे एका देशाचे नागरिक आहोत. दिल्ली आणि गोव्यात प्रदुषण होऊ नये म्हणून आपण सर्वांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे, असं त्यांनी म्हटलंय.

यावर पुन्हा प्रमोद सावंत यांनी उत्तर दिलं. त्यांनी म्हटलं की, मी आजच दिल्लीतून गोव्यात परतलो आहे. दिल्लीच्या हवेची गुणवत्ता मला माहित आहे. केजरीवालांनी गोव्याबद्दल बोलण्यापेक्षा आधी स्वत:च्या राज्याकडे पाहिलं पाहिजे. तसेच गोव्यात प्रदुषण होऊ नये म्हणून आम्ही कार्यरत आहोत. राज्य प्रदुषणमुक्त रहावं यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोतच. दिल्लीतील लोकांनाही असंच वाटत असेल असं मला वाटत. असं त्यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या ट्विटवर परत केजरीवाल यांनी गोव्यातील जनतेचं ऐका असा सल्ला दिला. या दोन्ही मुख्यमंत्र्यांच्या या ट्विटर वॉरवर अनेकांनी प्रतिक्रीया दिल्या आहेत. 

loading image