बिहार रणसंग्राम : डायर बनण्याची परवानगी कशी? तेजस्वी यांचा सवाल

सकाळ न्यूज नेटवर्क
Thursday, 29 October 2020

बिहारमधील मुंगेर येथे दुर्गा विसर्जनाच्या वेळी सोमवारी (ता.२६) गोळीबार होऊन एकाचा मृत्यू झाला. या घटनेवरून राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर आज हल्ला चढविला. ‘‘मुंगेरच्या पोलिसांना जनरल डायर बनण्याची परवानगी कोणी दिली?, असा प्रश्‍न करीत हा गोळीबार कोणाच्या तरी आदेशावरून झाला असल्याचा आरोप त्यांनी केला.

पाटणा - बिहारमधील मुंगेर येथे दुर्गा विसर्जनाच्या वेळी सोमवारी (ता.२६) गोळीबार होऊन एकाचा मृत्यू झाला. या घटनेवरून राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर आज हल्ला चढविला. ‘‘मुंगेरच्या पोलिसांना जनरल डायर बनण्याची परवानगी कोणी दिली?, असा प्रश्‍न करीत हा गोळीबार कोणाच्या तरी आदेशावरून झाला असल्याचा आरोप त्यांनी केला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी तेजस्वी यादव यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली. ‘जनरल डायरप्रमाणे वागण्याची परवानगी मुंगेर पोलिसांना कोणी दिली?, असा सवाल त्यांनी नितीश कुमार व उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांना केला.

Bihar Election 2020 - पहिल्या टप्प्यासाठी ५५ टक्के मतदान

गोळीबारातील मृताच्या कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त करीत या घटनेवर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री काय कारवाई करणार आहेत, अशी विचारणाही त्यांनी केली. नितीश गृहमंत्रीही आहेत, त्यांना पोलिस काय करतील, याची सूचना मिळाली असेलच ना? उपमुख्यमंत्री सुशील कुमार हे भाजपचे नेते आहेत. त्यांनी या घटनेवर एक ट्विटशिवाय काय केले, याची माहिती द्यावी, अशी मागणी तेजस्वी यांनी केली. 

रेल्वे तिकीटावरील प्रवाशाचे नावही बदलता येणार; IRCTCची सुविधा

‘दोषींना कठोरात कठोर शिक्षा द्यावी’
तेजस्वी यादव म्हणाले, की व्हिडिओत आपण पाहिले असेल की, लोकांना शोधून आणि बसवून मारले जात आहे. या घटनेत बिहारच्या दुहेरी इंजिनच्या सरकारची भूमिका काय आहे, हा प्रश्‍नच आहे. उच्च न्यायालयाच्या नियंत्रणात याची चौकशी करून दोषींना कठोरात कठोर शिक्षा दिली जावी. तेथील जिल्हा दंडाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांना हटविले पाहिजे. 

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bihar Election How to allow Dyer to become tejashwi yadav