esakal | 'नितीश कुमार यांना आम्ही हरवणार नाही तर...'; चिराग पासवान यांचा हल्लाबोल
sakal

बोलून बातमी शोधा

chirag paswan

'मोदी से कोई बैर नहीं, नितीश तेरी खैर नहीं' अशी काहीशी भुमिका लोजपाने स्विकारली आहे.

'नितीश कुमार यांना आम्ही हरवणार नाही तर...'; चिराग पासवान यांचा हल्लाबोल

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली: लोकजनशक्ती पार्टीचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएला रामराम ठोकला आहे. मात्र, केंद्रातील भाजपसोबत त्यांची साथ ही तशीच आहे. राज्यातील निवडणुकांत स्वतंत्रपणे लढत फक्त जेडीयूच्या उमेद्वारांविरोधात आपले उमेदवार उभे करण्याची भुमिका लोजपाने घेतली आहे. 'मोदी से कोई बैर नहीं, नितीश तेरी खैर नहीं' अशी काहीशी भुमिका लोजपाने स्विकारली आहे. एनडिटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत चिराग पासवान यांनी नितीश कुमार यांच्यावर जबरदस्त निशाणा साधला आहे. 

रामविलास पासवान यांचे चिरंजीव चिराग पासवान यांनी गेल्या रविवारी बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएपासून फारकत घेऊन स्वंतत्रपणे लढण्याची घोषणा केली आहे. त्यांनी जेडीयूच्या विरोधात सर्व जागांवर उमेदवार लढवण्याची घोषणा केली होती, मात्र भाजपच्या उमेदवारांविरोधात लढण्यासंदर्भात काही भाषा केली नव्हती. मात्र आता चिराग पासवान यांनी काही जागांवर भाजपाच्या विरोधात देखील उमेदवार उतरवण्याची तयारी केली आहे. 

हेही वाचा - सुशांतच्या प्रकरणात मुंबई पोलिसांच्या बदनामीचं षड्यंत्र; 80 हजार फेक अकाउंटचा वापर

लोजपाचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी म्हटलंय की, मी नेहमीच नितीश कुमार यांच्याविरोधात राहिलोय, कारण ते आपल्या सहकाऱ्यांचं ऐकत नाहीत. नितीश कुमारांचा आम्ही नाही तर जनताच धडा शिकवेल. युतीसंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी म्हटलं की, एनडीएत राहण्यासाठी भाजपाचा कसलाही दबाव आमच्यावर नव्हता. पण आम्ही पंतप्रधान मोदींशी एकनिष्ठ आहोत. निवडणुकानंतर जेडीयूसोबत जाण्यासंदर्भातील प्रश्नावर त्यांनी म्हटलं की यावर आताच चर्चा करण्यात अर्थ नाही. 

पासवान यांनी दावा केलाय की, बिहार निवडणुकीत भाजपा आणि लोजपा यांचे डबल इंजिनचे सरकार बनेल. त्यांनी म्हटलं की काही जागांवर भाजपाच्याविरोधात उमेदवार उभे करण्याचीही तयारी केलीय. 

हेही वाचा - हाथरस - मथुरेत PFI च्या 4 कार्यकर्त्यांना अटक; दंगलीच्या कटाचा आरोप

मुलाखतीतील काही महत्वाचे मुद्दे
- नितीश सहकाऱ्यांचं ऐकत नाहीत.
- जेडीयूसोबत आम्ही मजबूरीने होतो.
- जेडीयूला प्रत्येक जागेवर हरवण्यांचं ध्येय
- मी नेहमीच नितीश कुमारांच्या विरोधात
- आघाडीत राहण्यासंदर्भात भाजपाचा दबाव नाही.
- मोदींशी आम्ही एकनिष्ठ
- निकालानंतर जेडीयूसोबत जाण्यासंदर्भात आताच चर्चा निरर्थक
- भाजपा-लोजपाचे डबल इंजिन सरकार बनेल
- काही जागांवर भाजपाविरोधातही उमेदवार उभे करणार
- नितीशना आम्ही नाही जनताच धडा शिकवेल