

21 Ministers Secure Victory
Sakal
Prem Kumar's Unbroken Winning Streak : बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीए प्रचंड बहुमताकडे वाटचाल करत आहे. या विजयानंतर नितीश कुमार सरकारमधील किमान २१ मंत्री निवडून आले आहेत. या यादीत प्रेम कुमार, महेश्वर हजारी, संजय सरावगी यांसह अनेक दिग्गजांचा समावेश आहे. नितीश सरकारचे कृषीमंत्री आणि भाजपचे नेते प्रेम कुमार यांनी गया शहर येथून १९९० पासूनचा विजयाचा सिलसिला कायम ठेवला आहे. त्यांनी काँग्रेसचे अखौरी ओंकार नाथ यांना २६ हजार मतांनी हरवले. सम्राट चौधरी (तारापुर मतदारसंघ) यांनी आरजेडीचे उमेदवार अरुण कुमार यांच्यावर ४५ हजारांहून अधिक मतांची आघाडी घेतली आहे.