esakal | भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी माजी मंत्री असलेल्या काँग्रेस नेत्याला अटक
sakal

बोलून बातमी शोधा

vinay kulkarni

मालमत्तेच्या वादातून धारवाडमधील भाजप नेते योगेश गौडा यांची 2016 मध्ये हत्या झाली होती. योगेश गौडा जीममध्ये गेले असताना पाच जणांनी त्यांची हत्या केली होती.

भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी माजी मंत्री असलेल्या काँग्रेस नेत्याला अटक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बेंगळुरू - सीबीआय़ने गुरुवारी कर्नाटकात मोठी कारवाई करताना माजी मंत्री आणि काँग्रेस नेते विनय कुलकर्णी यांना अटक केली आहे. त्यांना सकाळी ताब्यात घेण्यात आलं होतं. त्यानंतर सायंकाळच्या सुमारास अटक कऱण्यात आल्याचं समजते. भाजप नेते योगेश गौडा यांची 2016 मध्ये हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी ही अटक झाल्याचं सांगण्यात येत आहे. 

याबाबत मिळालेली माहीती अशी की, मालमत्तेच्या वादातून धारवाडमधील भाजप नेते योगेश गौडा यांची 2016 मध्ये हत्या झाली होती. योगेश गौडा जीममध्ये गेले असताना पाच जणांनी त्यांची हत्या केली होती. या हत्येची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली होती. आरोपी कुलकर्णी यांच्या जवळचेच असल्याचं समोर आलं होतं. त्यावेळी कुलकर्णी हे कर्नाटकात मंत्री होते. 

सीबीआयच्या पथकाने कर्नाटकातील धारवाड जिल्ह्यातील बाराकोटरी इथून विनय कुलकर्णी यांना ताब्यात घेतलं. त्यानंतर कुलकर्णी यांना धारवाड उपनगरीय पोलिस स्टेशनमध्ये चौकशीसाठी नेण्यातं आलं. 

हे वाचा - सरकारी नोकरीच्या आमिषाने तब्बल 27 हजार जणांची फसवणूक; पोलिसांनी केली पोलखोल

राज्यात भाजप सत्तेत आल्यानंतर गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात योगेश गौडा हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला होता. यंदा मार्च महिन्यात सहा लोकांना या प्रकरणी अटक करण्यात आली होती. 

loading image