esakal | Bihar Election: 60 जागांवर 1000 पेक्षाही कमी मतांचे अंतर, दोन्ही आघाड्यांमध्ये 'टेन्शन'च
sakal

बोलून बातमी शोधा

nitish kumar tejashwi yadav.jpg

सुरुवातीच्या कलांनुसार महाआघाडीला आघाडी होती. नंतर इव्हीएमची मतमोजणी सुरु झाल्यानंतर चित्र बदलले. परंतु, सध्या तरी एनडीए बहुमताच्या पुढे आहेत. 

Bihar Election: 60 जागांवर 1000 पेक्षाही कमी मतांचे अंतर, दोन्ही आघाड्यांमध्ये 'टेन्शन'च

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली Bihar Election 2020- बिहार विधानसभेसाठी मतमोजणी सुरु आहे. दुपारी दोनपर्यंत केवळ 20 टक्क्यांच्या आसपास मतमोजणी झाली होती. त्यामुळे आतापर्यंत आलेले कल बदलूही शकतात. सकाळी मतमोजणी सुरु झाली होती, तेव्हा सुरुवातीच्या कलांनुसार महाआघाडीला आघाडी होती. नंतर इव्हीएमची मतमोजणी सुरु झाल्यानंतर चित्र बदलले. परंतु, सध्या तरी एनडीए बहुमताच्या पुढे आहेत. 

दीड वाजेपर्यंतच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास 60 जागा अशा आहेत जिथे दोन्ही आघाडीच्या उमेदवारांमधील मतांचे अंतर हे 1000 पेक्षा कमी आहे. सात जागांवर तर हेच अंतर 100 पेक्षा कमी मतांचे आहे. त्यामुळे जागांचे समीकरण कधीही बदलू शकते. 

हेही वाचा- Bihar Election: भाजपचे पासवान 'अस्त्र' यशस्वी! जेडीयू ठरणार छोटा भाऊ

दीड वाजेपर्यंत कसबा मतदारसंघातील लोजपाचा उमेदवार काँग्रेसच्या उमेदवारापेक्षा पाच मतांनी आघाडीवर होता. तर छपरा येथे आरजेडीचा उमेदवार भाजपच्या उमेदवारापेक्षा 6 मतांनी पुढे होता. अशाचपद्धतीने जेडीयू उमेदवार आरजेडीपेक्षा 10 मतांनी पुढे तर सरायरंजनमध्ये जेडीयू उमेदवार आरजेडीपेक्षा 22 मतांनी पुढे होता. 

हेही वाचा- Bihar Election: 2005 मध्ये पासवान यांनी बिघडवलं होतं गणित, चिराग इतिहासाची पुनरावृत्ती करणार?

शेखपुरा येथे जेडीयूचा उमेदवार आरजेडीपेक्षा 48 मते, नोखा येथे आरजेडी जेडीयूपेक्षा 73 मते, ओबरा येथे आरजेडी लोजपापेक्षा 93 मतांनी, बेलागंज येते आरजेडी जेडीयूपेक्षा 113 मतांनी पुढे तर आरा येथे सीआयचा (एमएल) उमेदवार भाजपापेक्षा 126 मतांनी पुढे होता. पाटणासाहिब येथे भाजप, गया शहर येथेही भाजप पुढे होता. परंतु, मतांचे अंतर मात्र कमी होते.