esakal | Bihar Election Update: बिहारच्या सत्तेची 'मॅजिक फिगर' कोणाच्या हातात?
sakal

बोलून बातमी शोधा

bihar election result live magic figure jdu rjd congress nda upa

सकाळच्या टप्प्यात महाआघाडी अर्थात महागटबंधनच्या बाजूने कल दिसत होते. मात्र, मतमोजणीचे टप्पे वाढत गेले तशी भाजप आणि संयुक्त जनता दलाने पिछाडी भरून काढली.

Bihar Election Update: बिहारच्या सत्तेची 'मॅजिक फिगर' कोणाच्या हातात?

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

पाटणा : अत्यंत चुरशीनं होत असलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीकडं संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय. मुख्यमंत्री नितीशकुमार आणि भाजप यांच्यावर पुन्हा बिहारी जनता विश्वास टाकणार की, तेजस्वी यादव यांच्या रुपाने देशात सर्वांत तरुण मुख्यमंत्री बिहार देणार, याची उत्सुकता संपूर्ण देशाला लागली आहे. 

आणखी वाचा - नितीशकुमारांच्या पराभवासाठी होमहवन!

मॅजिक फिगर काय?
बिहारच्या विधानसभेत 43 जागा आहेत. त्यापैकी 122 जागांवर विजय मिळाला तर, सत्ता स्थापन करणे शक्य आहे. सकाळच्या टप्प्यात महाआघाडी अर्थात महागटबंधनच्या बाजूने कल दिसत होते. मात्र, मतमोजणीचे टप्पे वाढत गेले तशी भाजप आणि संयुक्त जनता दलाने पिछाडी भरून काढली. सध्याचे कल पाहतात भाजप आणि संयुक्त जनता दल (जेडीयू) यांच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडी पुन्हा राज्यात सत्तेवर येण्याची शक्यता दिसत आहे. गेल्या निवडणुकीतील लालू प्रसाद यादव यांचा करिष्मा नसतानाही तेजस्वी यादव यांनी बिहार पिंजून काढत भाजप आणि नितीशकुमार यांना घाम फोडलाय हे मात्र निश्चित. भविष्यात बिहारमध्ये तेजस्वी यादव यांना कमी लेखण्याची चूक भाजप आणि नितीशकुमार करणार नाहीत, असे चित्र सद्या दिसत आहे. 

आणखी वाचा - मध्य प्रदेशात काँग्रेस पिछाडीवर, तरी कमलनाथ म्हणतात, 'मतदारांवर माझा विश्वास'

कमालीची चुरस 
बिहारच्या निकालाचे आकडे जस जसे  येत आहेत, अशी उत्सुकता आणखी वाढताना दिसत आहे. मतमोजणी सुरू असलेल्या जागांपैकी 25 जागांवरची आघाडी 500 मतांच्या आसपास आहे. तर, 29 जागांवर भाजप किंवा संयुक्त जनता दल 1 हजार मतांनी आघाडीवर आहे. विधानसभा निवडणुकीत इतक्या कमी मतांची आघाडी केव्हाही चित्र पालटणारी असते. त्यामुळे कोणत्याही क्षणी पुन्हा, तेजस्वी यादव यांचे जेडीयू आणि काँग्रेस आघाडीवर येईल, अशी आशा भाजपला विरोध करणाऱ्यांनी बाळगली आहे. इतकी मोठी चुरस असल्यामुळेच कोणत्याही राजकीय पक्षाने किंवा नेत्याने, या निकालावर अद्याप भाष्य केलेले नाही. सर्वच नेते सावध प्रतिक्रिया देताना दिसत आहे. कोणत्याही क्षणी निकाल बदलू शकतो, अशी सावध प्रतिक्रिया भाजपच्या सूत्रांनीही दिली आहे.