Bihar Election Result: बिहारने जातीय राजकारण नाकारले; मोदी यांची काँग्रेसवर टीका, सुरतमध्ये बिहारी नागरिकांशी संवाद
PM Narendra Modi: बिहारच्या निवडणुकीत एनडीएला मिळालेल्या मोठ्या यशावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरतमध्ये भाष्य केले. बिहारने जातीय राजकारण बाजूला ठेवून विकासाला मतदान केल्याचे त्यांनी म्हटले.
सुरत : ‘‘बिहारने जातीय राजकारण आणि धार्मिक तणावाचे विष नाकारले. त्याऐवजी सर्वसमावेशक आणि विकासकेंद्री कारभाराला कौल दिला,’’ असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.