Bihar Election: 'हा मोदींचा विजय', एक जागा जिंकणाऱ्या चिराग यांची प्रतिक्रिया

4chirag_paswan.jpg
4chirag_paswan.jpg

नवी दिल्ली Bihar Election 2020 - बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल आता स्पष्ट झाले असून नितीशकुमार यांच्या नेतृत्त्वाखाली एनडीएची सत्ता स्थापन होण्याचे मार्ग मोकळे झाल्याचे दिसत आहे. एकट्याने निवडणूक लढवून 30 हून अधिक जागांवर नितीशकुमार यांच्या जेडीयूच्या पराभवास कारण ठरलेले लोजपाचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी एनडीएच्या विजयाचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले आहे. जनतेमध्ये भाजपप्रति उत्साह असल्याचे त्यांनी म्हटले. निवडणुकीचे निकाल समोर आल्यानंतर चिराग पासवान यांनी टि्वट करुन 'बिहारच्या जनतेने आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास दाखवला..जे निकाल समोर आले आहेत, त्यावरुन स्पष्ट होते की, भाजप प्रती लोकांमध्ये उत्साह आहे..हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विजय आहे..'

चिराग पासवान यांनी दोन टि्वट केले आहेत. ज्यामध्ये त्यांनी पक्षाच्या भूमिकेचे स्वागत करत उमेदवारांच्या लढ्यावर विश्वास दाखवला आहे. त्यांनी म्हटले की, 'सर्व लोजपा उमेदवारांनी कोणाशीही आघाडी न करता आपल्या हिमतीवर ही निवडणूक लढवली. पक्षाच्या मतांची टक्केवारी वाढली आहे. लोजपाने या निवडणुकीत 'बिहार फर्स्ट, बिहारी फर्स्ट' या संकल्पनेसह या निवडणुकीत उतरली होती. पक्ष प्रत्येक जिल्ह्यात मजबूत झाला आहे. याचा लाभ येणाऱ्या काळात निश्चित मिळणार'.

दुसऱ्या टि्वटमध्ये चिराग म्हणाले की, मला माझ्या पक्षाचा अभिमान आहे की, सत्तेसाठी आम्ही कुणासमोर झुकलो नाही. आम्ही लढलो आणि आमचे म्हणणे जनतेपर्यंत पोहचवू शकलो..जनतेच्या प्रेमामुळे पक्ष आणखी मजबूत झाला आहे. बिहारच्या जनतेचे आभार. 

दरम्यान, 243 सदस्य संख्या असलेल्या बिहारमध्ये 75 जागा जिंकून आरजेडी सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर 74 जागांसर भाजप दुसऱ्या क्रमांकावर आहे. नितीशकुमार यांच्या जेडीयूला 43 जागांवर समाधान मानावे लागले आहे. जेडीयू तिसऱ्या क्रमांकावर आहे. सत्तारुढ एनडीएने 125 जागांसह बहुमत प्राप्त केले आहे. 

विरोधी महाआघाडीला 110 जागांवर विजय मिळाला आहे. डझनहून अधिक जागांवर महाआघाडीच्या उमेदवारांचा अत्यंत कमी मताने पराभव झाला आहे. हिलसा येथे जेडीयू उमेदवाराने केवळ 12 मतांनी आरजेडीच्या उमेदवारावर विजय मिळवला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com