esakal | Bihar Election : मायावतींना तेजस्वी यादव यांचा दणका; बिहारच्या प्रदेशाध्यक्षांनाच घेतलं RJD मध्ये
sakal

बोलून बातमी शोधा

BSP Bharat Bind

भरत बिंद यांनी म्हटलंय की नवा बिहार साकारण्यासाठी आणि भ्रष्ट अशा युवा विरोधी नीतीश सरकारला हटवण्याच्या संकल्पासाठी ते तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वात राजदमध्ये समाविष्ट झाले आहेत.

Bihar Election : मायावतींना तेजस्वी यादव यांचा दणका; बिहारच्या प्रदेशाध्यक्षांनाच घेतलं RJD मध्ये

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पटना : बिहार निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर एक मोठी बातमी येत आहे. बिहारमधील बहुजन समाज पार्टीला एक मोठा फटका बसला आहे. या पक्षाचे प्रदेशाध्यक्षच राष्ट्रीय जनता दलात सामील झाले आहेत. बसपाचे बिहारचे प्रदेशाध्यक्ष भरत बिंद यांना आज राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी स्वत: राजदची सदस्यता दिली आहे. या पार्श्वभूमीवर भरत बिंद यांनी म्हटलंय की नवा बिहार साकारण्यासाठी आणि भ्रष्ट अशा युवा विरोधी नीतीश सरकारला हटवण्याच्या संकल्पासाठी ते तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वात राजदमध्ये समाविष्ट झाले आहेत. भरत बिंद हे भभुआमधून राजदच्या तिकीटावर निवडणूक लढवू शकतात. 

आजच अशी बातमी आली होती की, उपेंद्र कुशवाहा यांच्या नेतृत्वातील राष्ट्रीय लोक समता पार्टी आणि बसपादरम्यान जागावाटपावर एकमत झालं आहे. यानुसार, बसपा बिहारमध्ये जवळपास 90 जागांवर निवडणूक लढवणार आहे. तर उर्वरित 153 जागा या रालोसपाला दिल्या जाणार आहेत. असं म्हटलं जात आहे की, यासंदर्भात सगळ्या घडामोडी या भरत बिंद यांनीच केल्या होत्या. मात्र, तेजस्वी यादव यांनी मायावतींसोबतच उपेंद्र कुशवाहा यांनाही मोठा झटका दिला आहे. 

हेही वाचा - Bihar Election - एनडीएत फूट? लोजपा वेगळी चूल मांडण्याच्या तयारीत

विधानसभेचं तिकीट न मिळाल्यामुळे प्रदेशाध्यक्ष भरत बिंद यांनी बसपाशी आपलं नातं तोडलं आहे. भभुआ विधानसभेची जागा ही रालोसपाला मिळालेली आहे. आणि बसपा-रालोसपा आघाडीकडून रालोसपाचे प्रदेशाध्यक्ष विरेंद्र कुशवाहा हे उमेदवार आहेत. 

हेही वाचा - Bihar Election : महाआघाडीचं चित्र पुरेसं स्पष्ट; 70 जागांवर लढू शकते काँग्रेस

भरत बिंद यांच्या आधीच बसपाचे दोन प्रदेशाध्यक्ष महाबली सिंह कुशवाहा आणि बृजकिशोर बिंद यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. महाबली सिंद कुशवाहा जेडीयूचे काराकाट मतदारसंघातून खासदार आहेत आणि बृजकिेशोर बिंद हे चैनपुर विधानसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. बसपा आणि रालोसपाच्या या आघाडीमध्ये जनवादी पार्टी सोशालिस्ट यांच्याव्यतिरिक्त आणखी काही पक्ष समाविष्ट होण्याची चर्चा आहे.