esakal | Bihar Election : इव्हीएम हॅक केले जाऊ शकत नाही का? काँग्रेस नेत्याचा सवाल
sakal

बोलून बातमी शोधा

udit raj

जर मंगळ आणि चंद्रावर जाणाऱ्या उपग्रहांची दिशा पृथ्वीवर बसून नियंत्रित केली जाऊ शकते तर काय इव्हीएम हॅक होऊ शकत नाही का, असाही त्यांनी सवाल केला आहे. 

Bihar Election : इव्हीएम हॅक केले जाऊ शकत नाही का? काँग्रेस नेत्याचा सवाल

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पाटणा: बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. सध्याचे मतमोजणीचे कल दाखवतायत की एनडीएची सत्ता पुन्हा एकदा बिहारमध्ये येऊ शकते. एक्झीट पोल्सनी मतमोजणीआधी दिलेल्या अंदाजात महागठबंधनला स्पष्ट बहुमत दिले होते. मात्र, आता महागठबंधन पिछाडीवर आहे. अनेक जागांवर हजारहून कमी फरकाने ही चुरशीची लढत दिसून येत आहे. आता या दरम्यानच काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ता डॉ. उदित राज यांनी ट्विट करुन म्हटलंय की, इव्हीएण हॅक केलं जाऊ शकतं. 

हेही वाचा - Bihar Election : आता भाजप मोठा भाऊ; लोजपाने केसाने कापला गळा?

त्यांनी म्हटलंय की, अमेरिकामध्ये इव्हीएमद्वारे निवडणुका झाल्या असत्या तर डोनाल्ड ट्रम्प देखील ही निवडणूक हारले नसते. अमेरिकेत जर इव्हीएमद्वारे निवडणुका झाल्या असत्या तर काय ट्रम्प हारले असते? जर मंगळ आणि चंद्रावर जाणाऱ्या उपग्रहांची दिशा पृथ्वीवर बसून नियंत्रित केली जाऊ शकते तर काय इव्हीएम हॅक होऊ शकत नाही का, असाही त्यांनी सवाल केला आहे. डॉ. उदित राज यांच्या या दोन्ही ट्विट्समुळे त्यांना खुप ट्रोल केलं जात आहे. 

उदीत राज यांच्या या ट्विटमुळे इव्हीएमचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. राहुल गांधी यांनी देखील बिहारच्या एका प्रचारसभेत इव्हीएमला एमव्हीएम म्हटलं होतं. एमव्हीएम म्हणजे मोदी व्होटींग मशीन आहे, असं म्हटलं होतं. पुढे त्यांनी असंही म्हटलं होतं की, असं असलं तरी बिहारच्या जनतेने आता ठामपणे ठरवलं आहे की एनडीएला पराभूत करायचं, असंही त्यांनी म्हटलं होतं.

हेही वाचा - Bihar election : प्रकाश राज यांची प्रतिक्रिया; म्हणाले भारत बरा होत आहे

बिहारच्या निवडणुकीचे सगळे अंदाज हे महागठबंधनच्या बाजूने होते. तेजस्वी यादव हे सर्वांत तरुण मुख्यमंत्री बनतील, असा विश्वास व्यक्त केला जात होता. मात्र, अद्याप कल एनडीएच्या बाजूने झुकलेले असून चुरशीची निवडणूक होताना दिसून येत आहे.