Bihar election : प्रकाश राज यांची प्रतिक्रिया; म्हणाले आशा आहे भारत बरा होत आहे

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 10 November 2020

प्रकाश राज देशातील चालू घडामोडींवर स्पष्ट भुमिका घेताना बऱ्याचदा दिसतात. 

 

Bihar election 2020

नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सध्या सुरु आहे. अत्यंत चुरशीची अशी ही निवडणूक  होत असून अद्याप निकालाचे आकडे स्पष्ट झाले नाहीयेत. नितीश कुमार हे गेल्या 15 वर्षांपासून बिहारचे मुख्यमंत्री राहीलेले आहेत. त्यांना राजदच्या तेजस्वी यादव यांनी जोरदार टक्कर दिली आहे. यावर आता बॉलिवूड आणि टॉलीवूड ऍक्टर प्रकाश राज यांची प्रतिक्रीया आली आहे. प्रकाश राज राजकारणावर सातत्याने व्यक्त होत दिसतात. देशातील चालू घडामोडींवर ते स्पष्ट भुमिका घेतानाही बऱ्याचदा दिसतात. 

हेही वाचा - Bihar Election: तेजस्वी समर्थकांनी हातात घेतले 'मासे'; घरासमोर केली गर्दी

आणि आता बिहारच्या निवडणुकीच्या निकालावर प्रकाश राज यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ट्विट करत म्हटलंय की, अमेरिकेत 'अबकी बार' संपलं. आज बिहार आहे. मी आशा करतो की माझा देश आता ठिक व्हायला सुरवात झालीय. प्रकाश राज यांच्या या ट्विटवर अनेक लोक कंमेट करत आहेत. तसेच आपली प्रतिक्रिया देत आहेत. 

सुरवातीच्या कलांमध्ये तेजस्वी यादव हे आघाडीवर दिसत होते. मात्र आता पुन्हा नितीश कुमारांनी सरशी केली आहे. अद्याप निकाल स्पष्ट झाला नसला तरीही हे कल सतत हलताना दिसत आहेत. त्यामुळे दोन्हीही बाजूंमध्ये चुरशीची लढत होताना दिसत आहे. राजद-काँग्रेस महागठबंधनने जेडीयू-भाजपच्या एनडीए आघाडीला मोठं आव्हान दिल्याचे दिसून येत आहे. 

हेही वाचा - Bihar Election : मतमोजणीत जेडीयूची आघाडी मात्र प्रवक्त्याने आधीच मान्य केला पराभव

बिहार विधानसभेच्या निवडणुका 243 जागांसाठी झालेल्या आहेत. तीन टप्प्यात झालेल्या या निवडणुकांची मतमोजणी सध्या सुरु आहे. समर्थकांनी तेजस्वी यादव यांच्या घरासमोर गर्दी केली आहे. तर नितीश कुमार हरावेत म्हणून पाटनामध्ये लोजपाने होमहवन सुरु केले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bollywood actor prakash raj on Bihar Election Result 2020