नराधम बापाचा लेकीवर बलात्कार; न्यायासाठी मुलीने व्हिडीओ केला शूट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rape

नराधम बापाचा लेकीवर बलात्कार; न्यायासाठी मुलीने व्हिडीओ केला शूट

पटना : देशभरात पितापुत्रींच्या नात्याला काळिंबा फासणाऱ्या घटना वाढताना सतत दिसत असून बिहारमधील समस्तीपूरमध्ये एका ५० वर्षीय व्यक्तीने आपल्या मुलीवर आत्याचार केला आहे. बलात्कार करताना आपल्या पित्याचा व्हिडीओ पिडीतेने छुप्या कॅमेराने शूट करुन व्हायरल केल्यावर पोलिसांना नराधमाला अटक केली आहे.

(Bihar Crime News)

हेही वाचा: पित्यानेच केला लेकीवर बलात्कार; नैराश्यातून तीने घेतला गळफास

सदर घटनेतील आरोपी पिता हा पेशाने शिक्षक असून समस्तीपूरमधील रोसेरा भागातील रहिवाशी आहे. तो आपल्या १८ वर्षीय मुलीवर आत्याचार करत असायचा. मुलीने एकदा एक छुपा कॅमेरा लावून आपल्यावर झालेल्या आत्याचाराचा व्हिडीओ रेकॉर्ड केला आणि तो व्हायरल केला असून त्यानंतर पिडीतेने तक्रार दिली होती. यानंतर पोलिसांना त्या नराधम पित्याला ताब्यात घेतलं असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा: क्युबामध्ये गॅसगळती; हॉटेलमधील स्फोटात 22 जणांचा मृत्यू

पिडीत मुलीवर तीचा नराधम पिता सारखा आत्याचार करत असल्याचं पिडीतेने सांगितलं आहे. त्यानंतर त्या मुलीने आपल्या पित्याने बलात्कार केल्याचा व्हिडीओ छुपा कॅमेरा लावून शूट केला आणि न्याय मागण्यासाठी सोशल मीडियावर शेअर केला होता त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं होतं. सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मुलीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं असून गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा: महानगरपालिकांच्या निवडणुका वेळेत होऊ लागल्या ते राजीव गांधी यांच्यामुळे

"पोलिसांनी व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या नराधमाला अटक केली असून त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. तसेच या घटनेतील आणखी आरोपींची शोध घेण्यात येत आहे." असं डीएसपी साहियर अख्तर यांनी सांगितलं. दरम्यान पिडीत मुलीच्या आईला हा प्रकार माहिती असतानाही ती नराधमाला विरोध करत नव्हती असं पिडीतेने सांगितलं, पिडीतेच्या मामाकडूनही पिडीतेवर दबाव आणला जात असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

दरम्यान उत्तरप्रदेशमध्ये आपल्या पित्याने बलात्कार केल्यामुळे एका मुलीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना काल घडली आहे. त्यासंदर्भात नराधम पित्याला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.

Web Title: Bihar Father Raped Daughter Video Viral Arrest

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Biharcrimerape news
go to top