
क्युबामध्ये गॅसगळती; हॉटेलमधील स्फोटात 22 जणांचा मृत्यू
हवाना : क्युबाची राजधानी हवाना येथे शुक्रवारी नैसर्गिक वायूच्या गळतीमुळे झालेल्या भीषण स्फोटात एका पंचतारांकित हॉटेलचे नुकसान झाले असून या स्फोटात आतापर्यंत 22 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे.
(Cuba Blast Accident 22 Death)
शुक्रवारी पहाटे हवाना येथील हॉटेल साराटोगा येथे गॅस गळतीमुळे हा स्फोट झाला असून यासंदर्भात माहिती अध्यक्ष मिगुएल डियाझ कानेल यांच्या कार्यालयाने ट्विट करुन दिली आहे. दरम्यान या दुर्घटनेत लोक अडकल्याची शक्यता लक्षात घेऊन घटनास्थळी बचाव कार्य सुरू करण्यात आल्याचे कार्यालयाच्या वतीने सांगण्यात आले.
हेही वाचा: इंदौरमध्ये पहाटे इमारतीला आग; 7 जणांचा होरपळून मृत्यू
स्थानिक प्रसारमाध्यमांनी अधिकाऱ्यांच्या हवाल्याने सांगितले की, या घटनेत सुमारे 30 लोक जखमी झाले आहेत तर 13 जण बेपत्ता आहेत. हवानाचे गव्हर्नर रेनाल्डो गार्सिया झापाटा यांनी स्थानिक माध्यमांना सांगितले की, 96 खोल्यांच्या हॉटेल साराटोगामध्ये नुकतेच नूतनीकरण सुरू असल्याने तेथे पर्यटक नव्हते. त्यामुळे मोठी जिवीतहानी टळली आहे पण तरीही 22 जणांचा या अपघातात मृत्यू झाला आहे.
हेही वाचा: पित्यानेच केला लेकीवर बलात्कार; नैराश्यातून तीने घेतला गळफास
तसेच या अपघातात हॉटेल साराटोगाचे गंभीर नुकसान झाले आहे. तसेच स्थानिक माध्यमांनी या घटनेदरम्यान आकाशात धुळीचे लोट उठल्याचे फोटो प्रकाशित केले आहेत. तसेच या हॉटेलच्या शेजारी असलेली शाळा रिकामी करण्यात आलं आहे. क्युबन न्यूज एजन्सी ACN च्या माहितीनुसार या पंचतारांकित हॉटेलमध्ये दोन बार, दोन रेस्टॉरंट आणि एक स्विमिंग पूल आहे.
Web Title: Cuba Hawana Five Star Blast Accident 18 Death
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..