Amit Lodha : ज्या आयपीएस अधिकाऱ्यावर 'वेब सिरिज' आली, त्यांच्याविरोधात गुन्हा; कारण...

Amit Lodha
Amit Lodha

नवी दिल्ली - ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवरील 'खाकी : द बिहार चॅप्टर' या वेब सीरिजचा खरा नायक अर्थात ज्यांच्यावर वेब सिरिज आधारित आहे त्या अमित लोढा याच्या अडचणीत वाढ झाली आहे. पाटणा येथे वरिष्ठ आयपीएस अधिकारी अमित लोढा यांच्याविरोधात एफआयआर नोंदवण्यात आला आहे. गयाचे आयजी अमित लोढा यांनी भ्रष्टाचार केल्याचा त्यांच्यावर आरोप असल्याचं गुरुवारी स्पेशल व्हिजिलन्स युनिटने (एसव्हीयू) स्पष्ट केलं. (fir against ips officer amit lodha )

हेही वाचा- Moonlighting And Tax Benefits : ‘मूनलायटिंग’च्या वाटे, नको ‘टॅक्स’चे काटे!

अमित लोढा यांनी 2017 साली प्रकाशित झालेलं 'बिहार डायरी' हे पुस्तक लिहिलं. या पुस्तकावर नेटफ्लिक्स आणि फ्रायडे स्टोरी टेलर यांनी मिळून 'खाकी' द बिहार चॅप्टर वेब सीरिज बनवली. ही वेब सीरिज 25 नोव्हेंबरला नेटफ्लिक्सवर रिलीज झाली होती. यात अमित लोढा हे एसपीच्या भूमिकेत होते.

मगध रेंजचे तत्कालीन आयजी अमित लोढा यांच्याविरोधात स्पेशल व्हिजिलन्स युनिटने (एसव्हीयू) एफआयआर नोंदवला आहे. तत्पूर्वी, एसव्हीयूने गयाचे तत्कालीन एसएसपी आदित्य कुमार यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला होता. बुधवारी त्यांच्या मालमत्तांवर छापा टाकला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com