esakal | 'तीन युवराज कुठं हनीमूनला जातात, काय करतात माहिती नाही'
sakal

बोलून बातमी शोधा

rahul gandhi tejaswi yadav

 बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि हिंदुस्तान आवाम मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जीतन राम मांझी यांनी आता एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

'तीन युवराज कुठं हनीमूनला जातात, काय करतात माहिती नाही'

sakal_logo
By
टीम ई सकाळ

पाटणा - बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि हिंदुस्तान आवाम मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जीतन राम मांझी यांनी आता एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी, एलजेपी अध्यक्ष चिराग पासवान आणि बिहार विधानसभेतील विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांच्यावर टीका केली आहे. ऐनवेळी ते कुठेतरी बाहेर गेलेले असतात यावरून जीतन राम मांझी यांनी निशाणा साधला आहे. 

जीतन राम मांझी यांनी म्हटलं की,'भारताचे, बिहारचे जे तीन युवराज आहेत, मग ते राहुल गांधी असोत, चिराग पासवान असोत किंवा तेजस्वी यादव असतो. वेळ आली की तिघेही त्यांचा हनीमून साजरा करायला कुठं जातात की काय करतात याचा पत्ता नसतो.'

मांझी यांच्या निवासस्थानी हिंदुस्तान आवाम मोर्चाची बैठक झाली. यामध्ये जीतन राम मांझीच पक्षाचे अध्यक्ष राहतील असा निर्णय घेण्यात आला. याआधी पक्षाचे नेतृत्व संतोष सुमन यांच्यावर सोपवलं जाण्याची शक्यता वर्तवली जात होती.  मात्र मांझी यांनी स्पष्ट केलं की, सध्या तरी पक्षाची जबाबदारी त्यांच्याकडेच असेल. 

हे वाचा - सोनिया गांधी आणि मायावती यांना भारतरत्न द्या; माजी मुख्यमंत्र्यांची मागणी

विधानसभा निवडणुकीत जर आमचा पक्ष 7 जागा जिंकला असता तर सत्तेची चावी आमच्याकडे राहिली असती असा दावाही मांझी यांनी केला. नितीश कुमार यांचे आभार मानतो कारण त्यांनी आम्हाला मुख्यमंत्री केलं आणि याचा फायदा गरीबांना होणार आहे. 

हे वाचा - कोरोना लस पोहोचणार देशाच्या काना कोपऱ्यात; 8 जानेवारीपासून दुसरी ड्राय रन

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे देशात महत्त्वाच्या घडामोडी घडत असताना परदेशात गेल्याने चर्चा होत आहे. शेतकरी आंदोलन सुरु असतानाच राहुल गांधी हे परदेशात आजीच्या भेटीसाठी गेल्यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे. त्यातच जीतन राम मांझी यांनी आता टीका केल्यानं पुन्हा चर्चा रंगली आहे. 

loading image