

Government Employees Social Media Policy
ESakal
सरकारी कर्मचाऱ्यांकडून सोशल मीडियाच्या वापराबाबत बिहार सरकारने एक मोठा आणि कडक निर्णय घेतला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत फेसबुक, ट्विटर (एक्स) आणि टेलिग्रामसह सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा गैरवापर करणाऱ्या सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. सरकारने स्पष्ट केले की, सोशल मीडियावर आक्षेपार्ह टिप्पण्या, वादग्रस्त पोस्ट पोस्ट करणे किंवा सरकारी धोरणांवर वैयक्तिक मते व्यक्त करणे हे गंभीर गैरवर्तन मानले जाईल.