Video : ...म्हणून पत्रकारानं घेतली गाढवाची मुलाखत

वृत्तसंस्था
Wednesday, 22 July 2020

जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला असून, अनेकांना जीव गमवावा लागला आहे. कोरोनापासून बचाव होण्यासाठी मास्कचा वापर करणे बंधनकारक असतानाही अनेकजण वापरताना दिसत नाही.

पाटना (बिहार): जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला असून, अनेकांना जीव गमवावा लागला आहे. कोरोनापासून बचाव होण्यासाठी मास्कचा वापर करणे बंधनकारक असतानाही अनेकजण वापरताना दिसत नाही. मास्कचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला जात असतानाच आता एक भन्नाट व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Video : कोरोना ही अल्लाहनं दिलेली शिक्षा...

या व्हिडिओमध्ये एका पत्रकाराने गाढवाची मुलाखत घेतली आहे. विनामास्क आणि सॅनिटाइझ न करता रस्त्यावर बसलेल्या गाढवाची मुलाखत घेत असताना त्यासोबत तिथे उपस्थित असलेल्या नागरिकांनाही हा पत्रकार प्रश्न विचारत आहे. या मुलाखतीमधून मास्क आणि सॅनिटायझर वापरण्याबाबत जनजागृती केली जात असल्याने सोशल मीडियावर हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. मास्क न वापरणाऱयांची तुलना गाढवासोबत करून नागरिकांच्या डोळ्यात अंजन घालण्याचं काम पत्रकाराने केले आहे. नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून कौतुक करताना दिसत आहेत.

गाढवाची मुलाखत घेणाऱ्या या पत्रकाराचा व्हिडिओ पाहिल्यानंतर चाँद नवाबची आठवण होते. मास्क न घालणाऱ्यांची गाढवासोबत तुलना करून एकप्रकारे खिल्ली उडवली असली तरीही मास्क किती अत्यावश्यक आहे हे सांगण्याचा प्रयत्न अनोख्या पद्धतीने केला आहे.

आईच्या पार्थिवाला खांदा देणाऱ्या पाचही मुलांचा मृत्यू...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bihar journalist raises awareness about masks and compare with donkey video viral