Video : कोरोना ही अल्लाहनं दिलेली शिक्षा...

वृत्तसंस्था
Wednesday, 22 July 2020

कोरोना हा आजार नसून आपल्या क्रुरकर्माची अल्लाहनं दिलेली शिक्षा आहे. नमाज पठण करून कोरोनापासून वाचू शकतात, असे अजब वक्तव्य समाजवादी पक्षाचे खासदार शफीकूर रहमान यांनी केले आहे.

लखनौ (उत्तर प्रदेश) : कोरोना हा आजार नसून आपल्या क्रुरकर्माची अल्लाहनं दिलेली शिक्षा आहे. नमाज पठण करून कोरोनापासून वाचू शकतात, असे अजब वक्तव्य समाजवादी पक्षाचे खासदार शफीकूर रहमान यांनी केले आहे.

गुन्हेगाराच्या शोधासाठी श्वान धावले 12 किमी अन्...

बकरी ईदच्या निमित्ताने मश्जीद खुले करण्याबाबत शफीकूर पत्रकारांशी बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, 'मश्जीदमध्ये केवळ 5 लोकांनी नमाज पठण करून काही होणार नाही. सर्व मुसलमानांनी नमाज पठण केले तरच हा देश वाचू शकतो. ईदच्या दिवशी आम्ही अल्लाहची माफी मागू, तो आपले सर्व गुन्हे माफ करेल आणि मला आशा आहे की आपण लवकरच या सगळ्यातून बाहेर पडू. करी ईदच्या निमित्ताने जनावरांची बाजारपेठ उघडण्याची मागणी केली. मुस्लिम समाजातील लोक बलिदानासाठी जनावरे खरेदी करु शकतील. एवढेच नाही तर मश्जीद उघडून तेथे लोकं कोरोनाचा नाश करण्यासाठी प्रार्थना करतील.'

दुसरीकडे सरकारच्या वतीने बकरी ईदसाठी नियमावली अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही आहे. मात्र केवळ 5 लोकांना मशीदीत जाण्याची मुभा असणार आहे. इतरांना घरून नमाज पठण करण्यास सांगण्यात येणार आहे. दरम्यान, देशातील कोरोनाबाधितांची संख्या सध्या 12 लाखांच्या घरात जाण्याची शक्यता आहे. कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी सध्या संपूर्ण देश एकत्र आहे. कोरोनाची लस लवकरात लवकर मिळावी, यासाठी शास्त्रज्ञ दिवसरात्र मेहनत करत आहेत. यातच समाजवादी पक्षाचे खासदार शफीकूर रहमान यांनी कोरोना हा आजार नसून आपल्या क्रुरकर्माची अल्लाहनं दिलेली शिक्षा आहे, असे अजब व्यक्तव्य केले आहे.

आईच्या पार्थिवाला खांदा देणाऱ्या पाचही मुलांचा मृत्यू...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mp shafiqur rahman said coronavirus is not a disease but punishment by god