esakal | घरात घुसून 22 वर्षीय तरुणीचे अपहरण; मुख्यमंत्र्यांनी गाठलं पोलिस मुख्यालय
sakal

बोलून बातमी शोधा

Kidnapping_

राजधानी पाटणाला लागून असलेल्या फुलवारी शरीफमध्ये भर दिवसा झालेल्या एका मुलीच्या अपहरणामुळे खळबळ उडाली आहे.

घरात घुसून 22 वर्षीय तरुणीचे अपहरण; मुख्यमंत्र्यांनी गाठलं पोलिस मुख्यालय

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन

पाटणा- राजधानी पाटणाला लागून असलेल्या फुलवारी शरीफमध्ये भर दिवसा झालेल्या एका मुलीच्या अपहरणामुळे खळबळ उडाली आहे. बिहारमध्ये कायदा आणि सुव्यवस्था अस्तित्वात आहे का?, अस सवाल उपस्थित होत आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री नितीश कुमार स्वत: पोलिस मुख्यालयात पोहोचले आहेत. यावेळी त्यांनी पोलिसांसोबत कायदा आणि सुव्यवस्थेबाबत चर्चा केली. 

विधानसभेत काही आमदार पैसे उकळण्यासाठी विचारतात प्रश्‍न, इम्तियाज जलील यांचा आरोप

बिरारमधील गुन्हेगारी आउट ऑफ कंट्रोल!

नितीश कुमार यांनी यावेळी पोलिस अधिकाऱ्यांना आवश्यक निर्देश दिले. फुलवारी शरीफमध्ये शस्त्रधारी काही तरुणांनी घरात घुसून तरुणीचे अपहरण केले आहे. 20 पेक्षा अधिक आरोपींनी 22 वर्षाच्या तरुणीचे अपहरण केल्याचं सांगितलं जातंय. मिळालेल्या माहितीनुसार तरुणी खासगी ट्यूशन घेते. कुटुंबीयांनी आरडाओरड केल्यानंतर ग्रामस्थ जमा झाले. त्यावेळी आरोपींनी हवेत गोळीबार केला आणि ते फरार झाले. 

घटनेनंतर तरुणीच्या घराजवळ मोठ्या प्रमाणात लोक जमा झाले होते. संतापलेल्या लोकांनी मोठा गोंधळ केला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस घटनास्थळी आले. त्यांनी लोकांना शांत केलं आणि प्रकरणाचा तपास सुरु केला. पण, ज्या पद्धतीने आरोपींनी तरुणीचे अपहरण केले, त्यामुळे लोकांमध्ये प्रचंड राग आहे. तसेच लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. 

ओमर अब्दुल्लांचा भाजपला टोला; DDC निवडणुकीच्या निकालावर दिली प्रतिक्रिया

मोहम्मद फिरोज उर्फ अफरोजवर अपहरणाचा आरोप

अपहरणाचा मुख्य सूत्रधार मोहम्मद फिरोज उर्फ अफरोज असल्याचं सांगितलं जात आहे. पोलिसांना परिसरातल्या सीसीटीव्ही फूटेजमधून कारमध्ये असलेल्या आरोपींचे फोटो मिळाले आहेत. पोलिस अधिकारी रहेमान यांनी सांगितलं की, बंदूकीचा धाक दाखवत तरुणीचे अपहरण करण्यात आले आहे. आरोपी फिरोज तरुणीच्या घराशेजारीच घर बनवत आहे. तो मुळचा सहरसा येथील रहिवाशी आहे. चौकशीत असं समोर आलंय की, युवती फिरोजच्या घरी शिकवणी देण्यासाठी जायची. दरम्यान, बिहारमध्ये गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे. 

loading image