मधुबनी : बिहारमधील मधुबनी जिल्ह्यात प्रेमविवाहाच्या (Love Marriage) वादातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पांडौल पोलीस ठाण्याच्या हद्दीत ब्रह्मतारा गावात एका तरुणाच्या वडिलांची गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना रविवारी रात्री घडली असून गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.