Muzaffarpur Case, Pregnant Woman Assaulted : बिहारमधील मुझफ्फरपूर जिल्ह्यात एक धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. अंधश्रद्धेच्या नावाखाली एका तांत्रिकानं ७ महिन्यांच्या गर्भवती महिलेवर (Pregnant Woman) तीन वेळा बलात्कार केला. पीडितला गरोदरपणात काही समस्या जाणवत होत्या. यावेळी गावकऱ्यांच्या सल्ल्यानुसार, तिनं शंकर साह या तांत्रिकाचा सल्ला घेतला. मात्र, उपचाराच्या नावाखाली तांत्रिकानं महिलेवर पाशवी अत्याचार केला.