नक्षलवाद्यांनी केली रेल्वेसेवा विस्कळित

वृत्तसंस्था
गुरुवार, 3 ऑगस्ट 2017

लखीसराई: जिल्ह्यातील दोन केबिनमॅनचे अपहरण करीत नक्षलवाद्यांनी आज रेल्वेसेवा विस्कळित केली होती. नक्षलवाद्यांतर्फे आठवडाभर आयोजित करण्यात आलेल्या "शहादत सप्ताहा'चाच हा भाग असल्याचे पोलिसांनी आज सांगितले.

नक्षलवाद्यांनी बुधवारी रात्री कैऊल-झाझा रेल्वे स्थानक आणि कैऊल - जमलपूर रेल्वे स्थानक दरम्यान रेल्वेसेवा विस्कळित झाली होती. मात्र आज सकाळी ती पूर्ववत करण्यात आली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. सहायक पोलिस अधीक्षक पवनकुमार उपाध्याय म्हणाले की, कैऊल झाझा रेल्वे स्थानकादरम्यान गोपालपूर येथे गाडी थांबल्यानंतर 15 ते 20 जणांच्या नक्षलवाद्यांच्या गटाने केबिनमॅनचे अपहरण करून रेल्वेसेवा विस्कळित केली. विभागीय पोलिस अधिकारी पंकज कुमार म्हणाले, की नक्षलवाद्यांनी उरेन रेल्वे स्थानकातील केबिनमॅनचेही अपहरण केले होते. त्यानंतर नक्षलवाद्यांनी पहाटेच्या सुमारास केबिनमॅनला सोडून दिले, असे पोलिसांनी सांगितले. आज पहाटे चारनंतर रेल्वेसेवा पुन्हा पूर्ववत सुरू झाली.

Web Title: bihar news railway and naxalite