Bihar News: धार्मिक मिरवणुकीदरम्यान दगडफेक; पोलिस कर्मचाऱ्यासह पत्रकार जखमी

Bihar News: धार्मिक मिरवणुकीदरम्यान दगडफेक; पोलिस कर्मचाऱ्यासह पत्रकार जखमी
esakal

Bihar News ratanmala stones pelted on mahavir procession

पाटणा- पश्चिम चंपारण नगर क्षेत्राच्या रतनमालामध्ये एका धार्मिक मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आली आहे. यात अनेक जण जखमी झालेत. माहितीनुसार, महावीर यात्रेच्या मिरवणुकीदरम्यान दोन गटांमध्ये झडप झाली. यात काही लोकांसह एक पत्रकार आणि पोलिस कर्मचारीही जखमी झाला आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. 'लाईव्ह हिंदूस्तान'ने यासंदर्भातील बातमी दिली आहे.

माहितीनुसार, सध्या रतनमाला येथील स्थिती तणावपूर्ण आहे, पण नियंत्रणात आहे. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलिस तैनात करण्यात आलेत. महावीरी आखाडा समितीकडून महावीर यात्रा मिरवणूक काढण्यात आली होती. यावेळी बडी मश्चिदजवळ एका गटाकडून मिरवणुकीला विरोध करण्यात आला. त्यानंतर दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर दगडफेक करण्यात आली. काही ठिकाणी जाळपोळही करण्यात आली.

Bihar News: धार्मिक मिरवणुकीदरम्यान दगडफेक; पोलिस कर्मचाऱ्यासह पत्रकार जखमी
धक्कादायक! बोट छाटलेल्या प्रकरणात सरकारमधील दोन मंत्री आरोपी; संजय राऊतांचा गौप्यस्फोट

सात ते आठ लोक दगडफेकीमध्ये जखमी झालेत. यात एका पत्रकाराचा आणि पोलिस कर्मचाऱ्याचा समावेश आहे. रुग्णातलातील अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, एकाची प्रकृती गंभीर आहे, तर अन्य लोक ठीक आहेत. माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले होते. मोठ्या प्रमाणात पोलिस तैनात करण्यात आले असून आता स्थिती सामान्य आहे.

Bihar News: धार्मिक मिरवणुकीदरम्यान दगडफेक; पोलिस कर्मचाऱ्यासह पत्रकार जखमी
Bail Approved: राहुल शेवाळे बदनामी प्रकरण; उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांना कोर्टाकडून जामीन मंजूर

पोलिस अधिक्षक अशोक चौधरी यांनी सांगितलं की, रतनमाला मधील स्थिती नियंत्रणात आहे. मोठ्या प्रमाणात पोलिस तैनात करण्यात आलेत. स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासन आणि पोलिसांनी आवश्यक ते निर्देश दिले आहेत. तरी रतनमाला येथे स्थिती तणावाची स्थिती आहे. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com