महिला आरक्षण विधेयक लोकसभेत मांडावे ः नितीशकुमार

उज्वलकुमार
मंगळवार, 14 नोव्हेंबर 2017

पाटणा: "महिला आरक्षणाला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. याबाबतचे विधेयक राज्यसभेत मंजूर झाले असून, आता ते लोकसभेत आणले पाहिजे,'' असे मत बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आज स्पष्ट केले. जाट व मराठा आरक्षणालाही पाठिंबा असल्याचे त्यांनी सांगितले.

पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, ""गुजरातमध्ये भाजपचा विजय निश्‍चित आहे. ज्या राज्यातील व्यक्ती पंतप्रधान आहे तेथील लोक दुसऱ्यांना मतदान का करतील? गुजरातबाबत माझे हे स्पष्ट मत आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुका एकत्रित घेण्याच्या मुद्यावार चर्चा होण्याची गरज आहे.''

ते म्हणाले, ""कथित गोरक्षाकांवर कारवाईसाठी आपली पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा झालेली आहे. अशा लोकांवर कारवाई करण्याबाबत त्यांनीही सार्वजनिकरीत्या जाहीर मत व्यक्त केलेले आहे.''

लालूप्रसाद यादव यांच्यावर टीका करताना ते म्हणाले, ""काही लोक माध्यमांत स्थान मिळावे म्हणून राजकारणातील वाईट बाबींची सीमारेषा ओलांडत आहेत. लालूप्रसाद यांना विकासकामांबाबत काही देणेघेणे नाही. अशांना लोक निवडणुकीत उत्तर देतील. तेजस्वी यादव त्यांच्या वडिलांमुळेच अडकले आहेत. त्यामुळे त्याचे राजकीय करिअर अडचणीत आले आहे.''

Web Title: bihar news Women's Reservation Bill to be presented in Lok Sabha: Nitish Kumar