
बिहार दौऱ्यावर असलेले काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या सुरक्षेत त्रुटी असल्याचा एक मोठा प्रकार समोर आला आहे. पूर्णिया येथे बाईक रॅलीदरम्यान एका तरुणाने राहुल गांधींना किस केले. त्यानंतर राहुल गांधींच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकाने धावत जाऊन त्या तरुणाला पकडून त्याला चापट मारली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.