Rahul Gandhi : नितीशकुमारांची गरज नाही; जातिनिहाय जनगणना आमच्यामुळेच झाली - राहुल गांधी

‘‘बिहारमध्ये सामाजिक न्यायासाठी महाआघाडी लढत राहील, यासाठी आघाडीला नितीशकुमार यांची गरज नाही,’’ असे काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी मंगळवारी स्पष्ट केले.
bihar nitish kumar politics join bjp rahul gandhi open up castwise census
bihar nitish kumar politics join bjp rahul gandhi open up castwise censusEsakal

पूर्णिया : ‘‘बिहारमध्ये सामाजिक न्यायासाठी महाआघाडी लढत राहील, यासाठी आघाडीला नितीशकुमार यांची गरज नाही,’’ असे काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी मंगळवारी स्पष्ट केले.

राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा सध्या बिहारमध्ये आहे. किशनगंजनंतर आज यात्रा पूर्णिया जिल्ह्यात पोहोचली. तेथे जाहीर सभेत बोलताना ते म्हणाले, ‘‘बिहारमध्ये जातिनिहाय जनगणना करणे आवश्‍यक आहे, असे मी नितीशकुमार यांना स्पष्ट सांगितले होते. आम्ही दबाव टाकल्याने त्यांनी जातिनिहाय जनगणना केली. पण देशात असे सर्वेक्षण व्हावे, असे भाजपला वाटत नाही.’’

जातिनिहाय जनगणनेची मागणी करताना राहुल गांधी म्हणाले, की इतर मागास वर्गीय (ओबीसी) समाज देशात सर्वात मोठा समाज आहे. पण देशात ओबीसी समाजाची लोकसंख्या किती आहे, असा प्रश्‍न मी विचारला तर तुम्ही सांगू शकणार नाहीत. देशात कोणाची किती लोकसंख्या आहे, याची गणना होणे आवश्‍यक आहे. पण भाजपला हे नको आहे.

दरम्यान, यात्रेनिमित्त राहुल यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. ‘‘शेतकऱ्यांच्या चिंता दूर करण्यात केंद्रातील मोदी सरकार अपयशी ठरले आहे. तुम्ही आम्हाला एक संधी द्या, आम्ही तुमचा विश्‍वास पुन्हा जिंकण्याचा प्रयत्न करू,’’ असे आवाहन त्यांनी केले. हे शब्द पोकळ नाहीत तर आमची मागील कारकीर्द याची साक्ष मिळेल. आम्ही शेतकरी हिताचे जमीन अधिग्रहण कायदा आणला. असेही राहुल यांनी सांगितले.

राहुल गांधी म्हणाले...

  • ‘भारत जोडो न्याय यात्रे’त आम्ही न्यायाच्या पाच गोष्टी सांगतो

  • यात एक न्याय भागीदारीचा मुद्दा आहे

  • देशात ९० अधिकारी सरकारी संस्था चालवितात. त्यातील फक्त तीन अधिकारी ओबीसी वर्गातील आहेत

  • देशाच्या सरकारमध्ये ओबीसी, एससी आणि एसटी वर्गातील लोकांची कोणतीही भागीदारी

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com