Nitish Kumar : 'आरडेजी'च्या कोट्यातील खात्यांची नितीश कुमार करणार चौकशी; रात्री उशिरा अधिसूचना

महाआघाडी सरकारच्या काळात राजद कोट्यातील खात्यांची चौकशी करण्याचा निर्णय बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी घेतल्याची माहिती शुक्रवारी उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी दिली. याबाबत रात्री उशिरा अधिसूचना जारी करण्यात आली.
Nitish Kumar
Nitish Kumaresakal

पाटणा : महाआघाडी सरकारच्या काळात राजद कोट्यातील खात्यांची चौकशी करण्याचा निर्णय बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी घेतल्याची माहिती शुक्रवारी उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी दिली. याबाबत रात्री उशिरा अधिसूचना जारी करण्यात आली.

नितीशकुमार यांच्या निर्णयामुळे तेजस्वी यादव यांच्याकडे राहिलेल्या विभागाची चौकशी होणार आहे. अधिसूचनेनुसार, आरोग्य विभाग, रस्ते बांधकाम, नगर विकास विभाग याशिवाय ग्रामीण विकास, खाण तसेच जनआरोग्य विभाग या विभागांत १ एप्रिल २०२३ पूर्वी घेतलेल्या निर्णयाची चौकशी केली जाणार आहे.

यापैकी तीन मोठे आरोग्य, रस्ते निर्मिती, नगरविकास विभागाची जबाबदारी तेजस्वी यादव यांच्याकडे होती. सरकारने म्हटले, चौकशीदरम्यान एखाद्या निर्णयात बदल करण्याची गरज भासली तर तेही केले जाईल. तज्ज्ञांच्या मते, तेजस्वी यादव यांनी घेतलेल्या निर्णयात फेरबदल होऊ शकतात.

Nitish Kumar
PM Surya Ghar Scheme : तुम्हालाही दरमहिन्याला 300 युनिट मोफत वीज पाहिजे? तर करा 'ही' तीन कामं...

नितीशकुमार सरकारचा खात्यांची चौकशी करण्याचा निर्णय सूडभावनेतून घेतल्याचा आरोप उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी फेटाळून लावला. हा सरकारचा विशेषाधिकार असून एनडीए सरकार पूर्वग्रहदूषित भावनेतून काम करत नसल्याचे स्पष्ट केले. त्यांनी घेतलेल्या निर्णयाचा आढावा घेणे आणि त्यात बदल करणे हे नियमित काम असल्याचेही ते म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com