पाटणा : बिहारमधील नामांकित उद्योजक गोपाळ खेमका (Gopal Khemka) यांची शुक्रवारी रात्री त्यांच्या घराजवळ गोळ्या घालून हत्या करण्यात आली. विशेष बाब म्हणजे, २०१८ मध्ये त्यांचा मुलगा गुंजन खेमका (Gunjan Khemka) यांचीही अशीच गोळीबार करून हत्या करण्यात आली होती. वडील-मुलाची एकाच प्रकारे झालेली हत्या ही केवळ दुर्दैवी नव्हे, तर संशयास्पद आणि गंभीर चिंतेचा विषय बनली आहे. या घटनेमुळे राज्यात खळबळ उडवली आहे.