पाटणा : बिहारची राजधानी पाटणा पुन्हा एकदा गोळीबाराच्या (Patna Shooting) घटनांनी हादरली आहे. शनिवारी (ता. १२) दिवसभरात शहरात दोन स्वतंत्र ठिकाणी गोळीबाराच्या घटना घडल्या. पिपरा भागात ग्रामीण आरोग्य अधिकाऱ्याची (Rural Health Officer) हत्या, तर कंकरबाग परिसरातील उद्यानात अज्ञात व्यक्तींकडून हवाई फायरिंग करण्यात आली.