Bihar Politics : "मी मृत्यू पत्करेन, पण…", पलटी मारण्याच्या चर्चेदरम्यान नितीश कुमारांचा जुना व्हिडीओ व्हायरल

Bihar CM Nitish Kumar Video Goes Viral : नितीश कुमार पुन्हा पलटी मारणार अशा चर्चा सुरू झाल्यानंतर अनेक राजकीय नेत्यांनी हा व्हिडीओ शेअर करत त्यांना 'पलटू राम' म्हणत प्रश्न उपस्थित केले आहेत.
Nitish Kumar
Nitish Kumaresakal

Bihar CM Nitish Kumar Video Goes Viral : नितीश कुमार हे एनडीएमध्ये सहभागी होण्याच्या चर्चांदरम्यान हा बिहारचे राजकारण चांगलेच चापले आहे. पाटणा शहरात सध्या राजकीय हालचालींना वेग आलेल्या असताना नितीश कुमार यांचा एक जुना व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये नितीश कुमार मी मरण पत्करेन पण मला एनडीएमध्ये सहभागी होणं मान्य नाही असे म्हणताना दिसत आहेत. अनेक राजकीय नेत्यांनी हा व्हिडीओ शेअर करत नितीश कुमार यांच्यावर टीका केली आहे.

नितीश कुमार पुन्हा पलटी मारणार अशा चर्चा सुरू झाल्यानंतर अनेक राजकीय नेत्यांनी हा व्हिडीओ शेअर करत त्यांना 'पलटू राम' म्हणत प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच हा व्हिडीओ सोशल मीडियावर देखील तुफान व्हायरल होत आहे.

समाजवादी पक्षाचे नेते राजीव राय यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे, ते म्हणाले की "तुम्ही दीर्घायुष्य व्हावे अशी आमची सर्वांची इच्छा आहे, तुम्ही देशाचे महान नेते आहात. तुम्ही आम्हा सगळ्यांना आशा आहे की भाजपविरोधात शपथ घेतली होती ती आपल्या सगळ्यांना मिळून पुर्ण करायची आहे. तुम्ही इंडिया आघाडीचे जनक आहात आणि तुम्ही पुन्हा पलटी माराल तर जनतेला काय वाटेल?"

Nitish Kumar
Bihar Political News : पलटी मारण्यापूर्वी नीतीश कुमार पोहचले मंदिरात... भाजप नेत्यासोबत केली पूजा

2023 मध्ये नितीश कुमार म्हणाले होते, "मी मृत्यू पत्करेन, पण त्यांच्याबरोबर (एनडीए) जाणं मला मान्य नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. तुम्ही असं समजा की या सगळ्या बोगस चर्चा आहेत. त्यांनी काही कराण नसताना किती गोष्टी केल्या होत्या."

1994 मध्ये नितीश कुमार यांनी जनता दल सोडले आणि जॉर्ज फर्नांडिस यांच्यासोबत समता पक्षाची स्थापना केली. त्यानंतर 1996 मध्ये नितीश भाजपमध्ये दाखल झाले आणि अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये मंत्री झाले. त्यानंतर 2003 मध्ये नितीश कुमार यांनी जनता दलासोबत समता पक्षाची युती करण्याचा निर्णय घेतला.

Nitish Kumar
Bihar Political Crisis : बिहार सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत भाजपची उच्चस्तरीय बैठक; अमित शाह यांच्यासह विनोद तावडे...

त्यानंतर 2014 मध्ये जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाचे उमेदवार बनले तेव्हा त्यांच्या विरोधासाठी त्यांनी एनडीए सोबतची 17 वर्षे जुनी युती तोडली. 2015 च्या निवडणुकीत त्यांनी राजद आणि काँग्रेससोबत युती केली. जी त्यांनी 2017 मध्ये तोडली आणि एनडीएमध्ये सामील झाले. पीटीआयनुसार, मुख्यमंत्री नितीश कुमार रविवारी (28 जानेवारी) राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com