Rabri Devi Statement : तेजप्रताप यादव प्रकरणावर पहिल्यांदाच राबडी देवींनी सोडलं मौन अन् जाहीर कार्यक्रमात, म्हणाल्या...

Rabri Devi breaks silence Tej Pratap Yadav case : राष्ट्रीय जनता दलाच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात राबडी देवी यांनी तेज प्रताप यादव वादावर आपली प्रतिक्रिया दिली.
Rabri Devi addresses a public gathering, breaking her silence on Tej Pratap Yadav's controversy amid heightened political tensions in Bihar.
Rabri Devi addresses a public gathering, breaking her silence on Tej Pratap Yadav's controversy amid heightened political tensions in Bihar. esakal
Updated on

Rabri Devi Finally Speaks on Tej Pratap Yadav Controversy : तेजप्रताप यादव यांना लालू कुटुंब आणि राजदमधून ६ वर्षांसाठी काढून टाकल्याबद्दल राबडी देवी यांनी पहिल्यांदाच मौन सोडलं आहे. शुक्रवारी राष्ट्रीय जनता दलाच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात राबडी देवी यांनी तेज प्रताप यादव वादावर आपली प्रतिक्रिया दिली. या कार्यक्रमात लालू प्रसाद यादव, तेजस्वी यादव, अब्दुल बारी सिद्दीकी यांच्यासह राजदचे सर्व मोठे नेते उपस्थित होते.

या कार्यक्रमाला व्यासपीठावरून संबोधित करताना राबडी देवी यांनी तेज प्रताप वादावर म्हणाल्या, "छोटे घर असो वा मोठे घर, प्रत्येकाच्या घरात भांडणे आहेत, प्रत्येकाच्या घरात भावांमध्ये फूट आहे, मग आमचे आणि इतर काय करतील... हा असा काळ आहे, आज 'मोदी'चं युग आलं आहे".

या कार्यक्रमात लालू यादव यांना पुन्हा एकदा राजदचे राष्ट्रीय अध्यक्ष घोषित करण्यात आले. कार्यक्रमात विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी कायदा आणि सुव्यवस्थेसह विविध मुद्द्यांवर नितीश सरकारला चांगलंच कोंडीत पकडले, तर लालू यादव यांनी जनतेला आश्वासन दिले की आम्ही तुमचा विश्वास डगमगू देणार नाही. 

Rabri Devi addresses a public gathering, breaking her silence on Tej Pratap Yadav's controversy amid heightened political tensions in Bihar.
SBI Bank Manager Viral Video : ''तुला iPhone देईन, शारीरिक संबंध ठेव..’’ म्हणत, महिला कर्मचारीशी घृणास्पद कृत्य करणाऱ्या SBI व्यवस्थापकाचा भांडोफोड!

तसेच याप्रसंगी लालू यादव यांनी तेजस्वी यादव यांच्याबद्दल सांगितले की, तेजस्वी दिवसरात्र सर्वकाही पाहतात, सर्वत्र जातात. आम्ही तेजस्वीला पुढे ठेवले आहे. निवडणुका येत आहेत, यात तेजस्वी यादव यांना जबाबदारी द्यावी लागेल. त्यांनी असेही म्हटले की आम्हाला आमच्या आरोग्याची काळजी नाही. आम्ही तेजस्वीला दररोज विचारतो की काय चालले आहे.

Rabri Devi addresses a public gathering, breaking her silence on Tej Pratap Yadav's controversy amid heightened political tensions in Bihar.
Eknath Shinde Reaction : ‘’मी जर पूर्ण दाढीवरून हात फिरवला असता, तर..’’ ; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा!

तथापि, तेजप्रताप यांच्यावर फक्त राबडी देवी यांचे विधान समोर आले आहे. या प्रकरणात लालू यादव आणि तेजस्वी यादव यांच्याकडून कोणतेही नवीन विधान समोर आलेले नाही. तर तेजप्रताप यादव देखील कुटुंब आणि पक्षापासून दूर झाल्यापासून सातत्याने सोशल मीडियावर कुटुंबाबत विविध पोस्ट करताना दिसत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com