
Allegations Against SBI Bank Manager in Una :हिमाचलमधील उना येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एका शाखेतील घृणास्पद अन् तितकाच संतापजनक प्रकार समोर आला आहे. या ठिकाणच्या बँकेच्या सेवा व्यवस्थापकाकडून महिला कर्मचारींचे कशाप्रकारे शोषण केले जात आहे, याचा भांडाफोड तेथील एका महिला कर्मचारीनेच केला आहे.
'माझ्याशी शारीरिक संबंध ठेवा, मी तुला आयफोन देईन.' असा व्यवस्थापकाने त्याच्या कनिष्ठ महिला कर्मचाऱ्याला संदेश पाठवला होता. तो सतत दोन महिला कर्मचाऱ्यांचा विनयभंग करत होता आणि त्यांच्यावर शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव आणत होता. परंतु एका पीडित महिला कर्मचारीने आरोपीचा दुसऱ्या महिला कर्मचारीचा विनयभंग करतानाचा व्हिडिओ गुप्तपणे बनवला आणि त्याला सर्वांसमोर आणलं. शिवाय, तिने संबंधित अधिकाऱ्यावर गंभीर आरोपही केले आहेत.
प्राप्त माहितीनुसार, उना जिल्ह्यातील एसबीआय शाखेत काम करणाऱ्या सेवा व्यवस्थापक मनिंद्र कंवर याच्यावर दोन महिला कर्मचाऱ्यांनी विनयभंग आणि शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव आणल्याचे गंभीर आरोप केले आहेत. आता पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी उना जिल्ह्यातीलच रहिवासी आहे.
पीडित महिला कर्मचारींनी पोलिसांना त्यांच्या तक्रारीत सांगितले की, आरोपी व्यवस्थापक मनिंद्र सिंह त्यांच्यावर बऱ्याच काळापासून शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव आणत होता आणि जर त्यांनी त्याच्याशी संबंध ठेवले तर तो त्यांना आयफोन देईल असे मेसेज पाठवत होता.
तर, एका कर्मचारीने तक्रारीत लिहिले आहे की ती त्याला बऱ्याच काळापासून माफ करत होती. परंतु २ जुलै रोजी आरोपी व्यवस्थापकाने तिच्या एका सहकारीसोबत घाणेरडे कृत्य केले. यादरम्यान तिने हे कृत्य फोनच्या कॅमेऱ्यात कैद केले. या व्हिडिओमध्ये आरोपीची संतापजनक कृती स्पष्टपणे दिसते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.