Bihar Election Result 2025: एनडीएच्या प्रचंड विजयावर उत्तराखंडचे सीएम पुष्कर सिंह धामी म्हणाले, 'मोदीमय झाले बिहार!'

Modi Magic : बिहार विधानसभा निवडणुकीत नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली एनडीएने २०० हून अधिक जागा जिंकत सत्ता मोठ्या बहुमताने राखली आहे. त्यामध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ठरत आहे (सुमारे ९० जागा). यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
Modi Magic in Bihar Election Result 2025

Modi Magic in Bihar Election Result 2025

Sakal

Updated on

बिहार निवडणूक निकाल २०२५ : उत्तराखंडमधील भाजप कार्यालयात या विजयाचा जल्लोष उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यकर्त्यांनी मिठाई वाटली आणि जोरदार नृत्य केले. या विजयाच्या उत्सवात मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी स्वतः सहभागी झाले. यावेळी 'मोदी' आणि 'धामी' यांच्या नावाच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. भाजप नेते याला 'मोदी मॅजिक' (Modi Magic) असल्याचे सांगत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com