चारा घोटाळा : CBI च्या आदेशामुळं लालूंच्या अडचणीत वाढ; आता थेट न्यायालयात हजर रहावं लागणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Lalu Prasad

चारा घोटाळाप्रकरणी RJD सुप्रीमो लालू प्रसाद (Lalu Prasad) यांना कोर्टात हजर राहण्यासाठी दिल्लीहून पाटणाला यावं लागणार आहे.

चारा घोटाळा : CBI च्या आदेशामुळं लालूंच्या अडचणीत वाढ

पाटणा : चारा घोटाळाप्रकरणी RJD सुप्रीमो लालू प्रसाद (Lalu Prasad) यांना कोर्टात हजर राहण्यासाठी दिल्लीहून (Delhi) पाटणाला यावं लागणार आहे. न्यायाधीशांनी लालूंना प्रत्यक्ष हजर (Physically present) राहण्याचे निर्देश दिले आहेत. याचाच अर्थ, लालू प्रसाद यांना CBI न्यायालयात हजर राहावं लागणार आहे. ते आता व्हिडिओ कॉन्फरन्सिंग किंवा वकिलाद्वारे न्यायालयात हजर राहू शकणार नाहीत.

याआधी मंगळवारी विशेष सीबीआय न्यायालयात (CBI Court) चारा घोटाळाप्रकरणी सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान मुख्य आरोपी लालू प्रसाद यांच्यासह सर्व आरोपींना 23 नोव्हेंबर रोजी विशेष न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासोबतच इतर आरोपी जिवंत आहेत, की नाही याचाही अहवाल देण्यास न्यायालयानं सांगितलंय.

हेही वाचा: UP Election : अखिलेश यादव, मायावतींना योगींचा दणका

23 नोव्हेंबर रोजी न्यायालयात प्रत्यक्ष हजर राहण्याचे निर्देश

मंगळवारी विशेष सीबीआय न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान जगदीश शर्मा, ध्रुव भगत, आरके राणा, वेद ज्युलियस, साधना सिंह, त्रिपुरारी मोहन प्रसाद यांच्यासह 16 आरोपी हजर झाले. तर, या प्रकरणात माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यांच्यासह तीन आरोपी वकिलामार्फत न्यायालयात हजर झाले होते. लालू प्रसाद, नागेंद्र पाठक आणि प्रकाश कुमार लाल हे आजारी असल्याने न्यायालयात प्रत्यक्ष हजर राहू शकले नव्हते. या तिघांनीही आजारपणामुळं सुनावणीदरम्यान वकिलामार्फत न्यायालयात हजर राहण्याचा अर्ज केला होता, तो अर्ज न्यायालयानं स्वीकारलाही होता. मात्र, 23 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या सुनावणीसाठी न्यायालयानं त्यांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. लालू प्रसाद यांना चारा घोटाळा प्रकरणात न्यायालयानं यापूर्वीच दोषी ठरवलंय. ते सध्या प्रकृतीच्या कारणास्तव जामिनावर आहेत. चारा घोटाळ्याशी संबंधित अनेक प्रकरणात लालू प्रसाद मुख्य आरोपी आहेत.

हेही वाचा: आर्मेनिया-अझरबैजानच्या युद्धात 15 सैनिक ठार; रशियाकडून मागितली मदत

loading image
go to top