अखिलेश यादव, मायावतींना योगींचा दणका; सपा-बसपाच्या 10 आमदारांचा आज भाजपात प्रवेश! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Uttar Pradesh Assembly Election

लवकरच जाहीर होणाऱ्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक 2022 च्या तयारीसाठी सत्ताधारी भाजपनं जोरदार कंबर कसलीय.

UP Election : अखिलेश यादव, मायावतींना योगींचा दणका

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

Uttar Pradesh Assembly Election : लवकरच जाहीर होणाऱ्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक 2022 च्या तयारीसाठी सत्ताधारी भाजपनं (BJP) जोरदार कंबर कसलीय. उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीपूर्वीच येथील पक्षांमध्ये चेंगराचेंगरीसारखं वातावरण निर्माण झालंय. याच भागात आज (बुधवार) भाजप अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांच्या समाजवादी (SP) आणि मायावती (Mayawati) यांच्या बसपाला (BSP) मोठा धक्का देणार असल्याचं समजतंय.

हेही वाचा: 'शरीरात रक्त आहे, तोपर्यंत BSF जवानांना भूमीत पाय ठेऊ देणार नाही'

पक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपमध्ये सपा आणि बसपाच्या आमदारांसह 100 बड्या नेत्यांचा समावेश करण्याचा प्रस्ताव समितीसमोर ठेवण्यात आला होता. समितीनं एसपीचे विधान परिषद सदस्य रवि शंकर पप्पू, सीपी चंद, अक्षय प्रसाप सिंग, रामा निरंजन आणि बसपचे ब्रजेश कुमार सिंग यांच्यासह दहा एमएलसींचा भाजपमध्ये समावेश करण्यास मान्यता दिलीय. सपा नेते सीपी चंद, रवि शंकर पप्पू, राम निरंजन, नरेंद्र भाटी आणि अक्षय प्रताप आज भाजपमध्ये प्रवेश करू शकतात. हे सर्वजण सध्या विधान परिषदेचे म्हणजे, एमएलसीचे सदस्य असून त्यांचा कार्यकाळ पुढील वर्षी मार्चमध्ये संपत आहे. गेल्या रविवारी भाजप हायकमांडनं सपाच्या बंडखोरांना पक्षात सामावून घेण्यास 'ग्रीन सिग्नल' दिला होता. याशिवाय, बहुजन समाज पक्ष आणि काँग्रेसच्या काही नेत्यांच्या नावांनाही मंजुरी देण्यात आली असून येत्या काही दिवसांत सपा, बसपचे विद्यमान आमदारही भाजपमध्ये प्रवेश करू शकतात.

हेही वाचा: आर्मेनिया-अझरबैजानच्या युद्धात 15 सैनिक ठार; रशियाकडून मागितली मदत

वास्तविक, या सर्व आमदारांना येत्या निवडणुकीत तिकीट निश्चित करायचे असून, याबाबत सध्या भाजपमध्ये मंथन सुरू आहे. निर्णय झाल्यानंतर परिस्थिती स्पष्ट होईल आणि लवकरच यासंदर्भात घोषणा होण्याचीही शक्यता आहे. या महिन्याच्या सुरुवातीला, यूपी भाजपनं इतर पक्षांमधील बंडखोर नेत्यांवर लक्ष ठेवण्यासाठी चार सदस्यांची टीम तयार केली होती. मात्र, पक्षात येणाऱ्या नेत्यांची पार्श्वभूमी कळेल, यासाठी भाजपनं ही समिती स्थापन केली होती. याआधी अनेक वादग्रस्त नेत्यांनी पक्षात प्रवेश केल्यानंतर भाजपला हा निर्णय मागे घेतल्यानं अपमान सहन करावा लागला होता.

loading image
go to top