आर्मेनिया-अझरबैजानच्या युद्धात 15 सैनिक ठार; रशियाकडून मागितली मदत I Armenia Army | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Armenia Azerbaijan War

आर्मेनिया आणि अझरबैजानच्या सैन्यांमध्ये पुन्हा एकदा हिंसक चकमक झालीय.

आर्मेनिया-अझरबैजानच्या युद्धात 15 सैनिक ठार; रशियाकडून मागितली मदत

Armenia Azerbaijan Border Clashes : आर्मेनिया आणि अझरबैजानच्या सैन्यांमध्ये पुन्हा एकदा हिंसक चकमक झालीय. आर्मेनियानं दावा केलाय, की या चकमकीत त्यांचे 15 सैनिक मारले गेले, तर 12 सैनिक अझरबैजाननं पकडले आहेत. आर्मेनियानं आपला कब्जा केलेला प्रदेश आणि सैन्य मुक्त करण्यासाठी रशियाची मदत घेतलीय. अझरबैजानच्या लष्करानं आर्मेनियातील (Armenia Army) दोन भाग ताब्यात घेतल्याचा दावा केला जात आहे. दोन्ही देशांमधील वाद एवढा वाढण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या वर्षी नागोर्नो-काराबाख भागावर आर्मेनिया आणि अझरबैजान यांच्यात 44 दिवसांचे युद्ध झाले होते.

यामध्ये 6500 लोकांचा मृत्यू झाला, तर 10,000 लोक जखमी झाले. ही लढाई अझरबैजानच्या निर्णायक विजयानं संपली. इस्रायल आणि तुर्कस्ताननं या युद्धात अझरबैजानला उघडपणे पाठिंबा दिला, तर रशियानं आर्मेनियाला फारशी मदत केली नाही. रशियाच्या मध्यस्थीनंतर हा संघर्ष संपला. त्यावेळी शांतता राखण्यासाठी रशियानं नागोर्नो-काराबाखमध्ये आपले 2,000 सैनिक तैनात केले होते.

हेही वाचा: चीन बनला जगातला सर्वात 'श्रीमंत देश'

आर्मेनियानं दोन प्रदेश घेतले ताब्यात

रशियन वृत्तसंस्थांनी आर्मेनिया संरक्षण मंत्रालयाच्या अहवाल्यानं म्हटलंय, की आर्मेनिया सैनिकांवर अझरबैजान सैन्यानं तोफखाना, शस्त्रे आणि चिलखती वाहनांनी हल्ला केलाय. यामध्ये 15 सैनिक मारले गेले, तर 12 पकडले गेले आहेत. आर्मेनियानं अझरबैजानच्या सीमेजवळील दोन लष्करी तळावर कब्जा केलाय. अझरबैजानच्या संरक्षण मंत्रालयाचं म्हणणं आहे, की त्यांनी आर्मेनियाच्या चिथावणीला प्रत्युत्तर देण्यासाठी लष्करी मोहीम सुरू केली. अझरबैजाननं आपल्या वक्तव्यात आर्मेनियाच्या लष्करी आणि राजकीय नेतृत्वावर आरोप केले आहेत. आर्मेनियन सैन्यानं अझेरी आर्मी पोस्टवर तोफखाना आणि गोळीबार केल्यानं हे प्रत्युत्तर आम्ही दिले असल्याचे अझरबैजाननं म्हटलंय. दरम्यान, अझरबैजाननं आर्मेनियाचा सार्वभौम प्रदेश ताब्यात घेतलाय. म्हणूनच, आम्ही रशियाला आमच्या देशांमधील विद्यमान 1987 कराराच्या आधारे आर्मेनियाच्या प्रादेशिक अखंडतेचं रक्षण करण्यास सांगत आहोत, असं आर्मेनियानं सांगितलंय.

हेही वाचा: 'शरीरात रक्त आहे, तोपर्यंत BSF जवानांना भूमीत पाय ठेऊ देणार नाही'

loading image
go to top