बिहारमध्ये शिवसेना ५० जागांवर निवडणूक लढवणार

सकाळ न्यूज नेटवर्क
Saturday, 10 October 2020

बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा राजकीय वापर करत मुंबईची बदनामी करत शिवसेनेवर निशाणा साधला गेल्याने शिवसेना देखील आता बिहारच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरत प्रचाराच्या निमित्ताने वचपा काढणार आहे. शिवसेनेची बिहारमध्ये ताकद कमी असली तरी भाजप उमेदवारांच्या विरोधात मतदार उभे करत भाजपला चिमटे काढण्याची संधी प्रचारादरम्यान शिवसेना साधणार आहे.

विधानसभा निवडणुकीत ५० जागा लढविण्याची शक्यता; प्रचाराबाबत उत्सुकता
मुंबई - बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा राजकीय वापर करत मुंबईची बदनामी करत शिवसेनेवर निशाणा साधला गेल्याने शिवसेना देखील आता बिहारच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरत प्रचाराच्या निमित्ताने वचपा काढणार आहे. शिवसेनेची बिहारमध्ये ताकद कमी असली तरी भाजप उमेदवारांच्या विरोधात मतदार उभे करत भाजपला चिमटे काढण्याची संधी प्रचारादरम्यान शिवसेना साधणार आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शिवसेनेने उत्तरेकडील राज्यांमध्ये यापूर्वी अगदी हाताच्या बोटावर मोजता येईल एवढ्याच जागांवर निवडणूक लढवली होती.  यावेळी मात्र प्रथमच शिवसेना ५० जागांवर निवडणूक लढवणार असून त्याही भाजपच्या विरोधात असल्याने शिवसेनेच्या प्रचाराबाबत मात्र उत्सुकता आहे. सुशांतसिंहच्या मृत्युमुळे शिवसेनेच्या राज्यात परप्रांतीयांवर अन्याय होत असल्याचा चित्र बिहारमध्ये तयार झालेला असतानाही शिवसेना एवढ्या मोठ्या प्रमाणात जागा लढविण्याविषयी आश्चर्य व्यक्त असले तरी शिवसेना मोठ्या तयारीने प्रचाराला लागली.

राहुल गांधींनी शेअर केला मोदींची खिल्ली उडवणारा व्हिडिओ 

ठाकरे पिता-पुत्रांचा व्हर्च्युअल प्रचार
मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे बिहार निवडणुकीच्या प्रचारासाठी प्रत्यक्ष जाणार नाहीत. ऑनलाइन सभांच्या माध्यमातून ते बिहार निवडणुकीचा प्रचार करणार असल्याची माहिती शिवसेना नेत्यांनी दिली.

स्विस बँकेत कुणा-कुणाची खाती ? भारत सरकारला मिळाली दुसरी यादी

बिहार विधानसभा निवडणुकीत शिवसेना ५० जागा लढवणार आहे. या निवडणुकीच्या प्रचारासाठी शिवसेनेकडून २० स्टार प्रचारकांची यादी निवडणूक आयोगाला दिली आहे. त्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचाही समावेश आहे. मात्र प्रचारात प्रत्यक्ष सहभागी न होता ते व्हर्च्युअल सभा घेणार करणार आहेत. स्थानिक नेत्यांसह महाराष्ट्रातील नेत्यांचा स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश आहे.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bihar Shivsena will contest 50 seats politics