esakal | स्विस बँकेत कुणा-कुणाची खाती ? भारत सरकारला मिळाली दुसरी यादी
sakal

बोलून बातमी शोधा

swiss bank.jpg

स्विस अधिकाऱ्यांनी मागील वर्षभरात 100 हून अधिक भारतीय नागरिक आणि संस्थांची माहिती दिली आहे. 

स्विस बँकेत कुणा-कुणाची खाती ? भारत सरकारला मिळाली दुसरी यादी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली- स्वित्झर्लंडने माहिती आदान-प्रदान करारानुसार देशातील स्विस बँकेतील खातेधारकांच्या विस्तृत माहितीची दुसरी यादी भारत सरकारला सोपवली आहे. यामुळे विदेशात असलेल्या काळ्या पैशाविरोधातील सरकारच्या लढाईला आणखी मजबुती प्राप्त होईल. स्वित्झर्लंडने म्हटले आहे की, 86 देशांना 31 लाख आर्थिक खात्यांबाबत माहिती देण्यात आली आहे. भारताचा या 86 देशांत समावेश आहे. स्वित्झर्लंडच्या संघीय कर प्रशासनाने (एफटीए) यावर्षी जागतिक मानकाअंतर्गत आर्थिक खात्यांची माहिती आदान-प्रदान केली आहे. 

या करारानुसार सुमारे 3.1 मिलियन (31 लाख) आर्थिक खात्यांचा यात समावेश होता. स्वित्झर्लंडने स्विस बँकेच्या ग्राहक आणि विविध आर्थिक संस्थांच्या आर्थिक खात्यांबाबत जो तपशील दिला आहे. त्यात भारताचा समावेश असल्याचे अधिकाऱ्यांनी 'पीटीआय'ला सांगितले.

हेही वाचा- भारताची मिसाईल ताकद वाढली; एँटी-रेडिएशन मिसाईल 'रुद्रम'ची यशस्वी चाचणी

स्विस अधिकाऱ्यांनी मागील वर्षभरात 100 हून अधिक भारतीय नागरिक आणि संस्थांची माहिती दिली आहे. 

हेही वाचा- राजस्थानात पुजाऱ्याला जिवंत जाळलं; जमिनीच्या वादातून घडली धक्कादायक घटना

स्विस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीमध्ये ओळख, खाते आणि आर्थिक माहितीचा समावेश आहे. यामध्ये नाव, पत्ता, निवासस्थान त्याबरोबर आर्थिक संस्था, खात्यातील शिल्लक आणि भांडवलाच्या उत्पन्नाशी संबंधित माहितीचा समावेश आहे. 
 

loading image