सासाराममधला अमित शहांचा कार्यक्रम रद्द; भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणाले, आम्ही सम्राट अशोकाचा.. I Amit Shah | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Amit Shah Sasaram

सध्या डझनहून अधिक लोकांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली जात आहे. याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Amit Shah : सासाराममधला अमित शहांचा कार्यक्रम रद्द; भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणाले, आम्ही सम्राट अशोकाचा..

गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) आज (शनिवार) पाटणा इथं पोहोचणार आहेत. मात्र, सासाराम येथील सम्राट अशोकावरील त्यांचा प्रस्तावित कार्यक्रम रद्द करण्यात आलाय.

याबाबत माहिती देताना भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष सम्राट चौधरी (Samrat Chaudhary) म्हणाले, 'आम्ही सासाराममध्ये सम्राट अशोक यांच्या स्मरणार्थ एक मोठा कार्यक्रम घेणार होतो, पण बिहार सरकार (Bihar Government) सुरक्षा देऊ शकलं नाही.'

गृहमंत्री अमित शहांच्या सासाराम (Sasaram) दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर, परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र, कलम 144 लागू झाल्यामुळं आणि घटनास्थळी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाल्यानं शहा यांचा दौरा रद्द करण्यात आला आहे.

कादिरगंज, मुबारकगंज, चौखंडी नवरत्न बाजार येथील दुकानांसोबतच घरांचे दरवाजेही बंद आहेत. असं असतानाही आज 10 मिनिटं दगडफेक झाली. यामध्ये कोणी जखमी झाल्याची माहिती मिळालेली नाही. मात्र, या घटनेनं तणाव कायम असल्याचं सांगितलं जात आहे.

परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला आहे. सध्या डझनहून अधिक लोकांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली जात आहे. याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस माईकद्वारे कलम 144 लागू करण्याबाबत माहिती देत ​​आहेत. इंटरनेट सेवा बंद ठेवून अफवा रोखण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

टॅग्स :BiharAmit Shah