'नितीशकुमार जास्त दिवस मुख्यमंत्री राहणार नाहीत, बिहार त्यांचा पर्याय शोधणार'

nitishkumar main.jpg
nitishkumar main.jpg

पाटणा Bihar Election 2020 - एनडीएला पूर्ण बहुमत मिळाल्यानंतर बिहारमध्ये नवीन सरकार स्थापन करण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. पाटणा येथे एनडीएची नेता निवडीची बैठक सुरु असतानाही आरजेडीने मात्र सत्तेची आस सोडलेली नाही. आरजेडीचे प्रवक्ते तथा राज्यसभा सदस्य मनोज झा यांनी नितीशकुमार यांच्याकडे काठावरचे बहुमत असून हे सरकार जास्त दिवस टिकणार नसल्याचे म्हटले आहे.

'एएनआय'शी बोलताना मनोज झा म्हणाले की, हे सरकार जास्त दिवस टिकू शकणार नाही. 40 जागा जिंकून कोणी मुख्यमंत्री कसा बनू शकतो ? जनादेश त्यांच्या विरोधात आहे. त्यांना नाकारण्यात आले आहे. यावर त्यांनी स्वतः विचार करायला हवा. बिहारला त्यांचा पर्याय मिळेल, सहज मिळेल. यासाठी एक आठवडा, दहा दिवस किंवा एक महिना लागू शकतो. पण असे निश्चितच होणार. 

यापूर्वी मनोज झा यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले होते की, काही दिवस वाट पाहा. 40 जागा जिंकून जनतेने नाकारल्यानंतर जर कोणी मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहत असेल तर ते स्वप्न बिहारला पचत नाहीये. 

जनता जनार्दनाचा 'निर्णय' आणि प्रशासनाकडून जारी केलेले निकाल यातील अंतर जाणण्यासाठी 'जनादेश व्यवस्थापन'ची अद्बूत कला समजायला हवी. ही कला सर्वांना उपलब्ध नाही. बिहार अजूनही 'खुला' आहे, असे त्यांनी म्हटले.

दरम्यान, तेजस्वी यादव यांनी पत्रकार परिषदेत बोलताना नितीशकुमार यांच्यावर निशाणा साधला होता. जनतेचा निर्णय महाआघाडीच्या तर निवडणूक आयोगाचा एनडीएच्या बाजून आहे. नितीशकुमार तिसऱ्या क्रमांकावर आले आहेत आणि बिहारच्या लोकांनी जो जनादेश  दिला तो बदलाचा जनादेश आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com